Uncategorized

सर्वसामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे दिलखुलास व मनमोकळे नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव.

सदाशिवनगरचे माजी सरपंच, कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालयाचे माजी सभापती, धर्मवीर सदाशिवराव माने पाटील पतसंस्थेचे चेअरमन प्रताप सालगुडे पाटील उर्फ बापू यांचा वाढदिवस संपन्न

सदाशिवनगर ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगरचे सर्वसामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे, दिलखुलास, मनमोकळ्या स्वभावाचे, हसतमुख नेतृत्व, मोहिते पाटील यांचे विश्वासू व एकनिष्ठ असणारे सदाशिवनगरचे माजी सरपंच, कर्मवीर बाबासाहेब माने पाटील विद्यालयाचे माजी सभापती, धर्मवीर सदाशिवराव माने पाटील पतसंस्थेचे चेअरमन प्रताप नामदेव सालगुडे पाटील उर्फ बापू यांचा वाढदिवस संपन्न झाला. वाढदिवसानिमित्त अनेक मित्रपरिवार व नातेवाईक यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे. सदाशिवनगरचे सुप्रसिद्ध व्यापारी व धर्मवीर सदाशिवराव माने पाटील पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन प्रशांत जम्बुकुमार दोशी यांनी सन्मान केला. यावेळी सुभाष सुज्ञे, वामनकाका सालगुडे पाटील, रणजीत सालगुडे पाटील, बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शंकर सहकारी साखर कारखान्याकडे वाहतूक संघटनेचे चेअरमन नामदेव नारायण सालगुडे पाटील यांनी भूषवलेले होते. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने धर्मवीर सदाशिवराव माने पाटील पतसंस्थेची स्थापना केलेली होती. सलग 26 वर्ष चेअरमन पदाची धुरा नामदेव सालगुडे पाटील यांनी सांभाळलेली होती. त्यांच्या पश्चात प्रताप नामदेव सालगुडे पाटील उर्फ बापू यांनी चेअरमन पदाची धुरा सांभाळत आहे. बापूंनी मोहिते पाटील परिवारातील विजयदादा, बाळदादा, पप्पासाहेब यांच्या विचाराचे व एकनिष्ठेचे राजकारण व समाजकारण केलेले आहे. मोहिते पाटील परिवाराचा विश्वास संपादन केलेला आहे.

कर्मवीर बाबासाहेब माने पाटील विद्यालय सदाशिवनगर या विद्यालयाच्या सभापतीपदी सात वर्ष व वीस वर्ष संचालक पदी काम केले आहे. ते सदाशिवनगर ग्रामपंचायत दहा वर्ष सरपंच पदावर कार्यरत होते‌. त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी पदावर दहा वर्ष काम करण्याची संधी मिळालेली आहे. बापूंनी राजकीय पदाबरोबर प्रजोततात्या सालगुडे पाटील मित्र मंडळ व गणेश मंडळाची स्थापना करून समाजामध्ये सामाजिक कार्याचा आदर्श घडवून दिलेला आहे. बापूंनी वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मोहिते पाटील परिवार यांच्याशी एकनिष्ठ राहून पतसंस्था व शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीला उपयोगी पडून समाजामध्ये आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. सुसंस्कृत स्वभाव, स्वच्छ विचारसरणी, सहकार्याची भावना, सर्व जाती धर्मामध्ये मिळून मिसळून, सर्वांच्या सुख दुःखामध्ये सहभागी राहून सर्वांच्या मनामध्ये आपलेपणा व प्रेम निर्माण केलेले असल्याने सदाशिवनगरसह आसपासच्या 15 ते 20 गावांमध्ये दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्यावर मित्रपरिवार व नातेवाईक यांचेकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button