तीन पिढ्यांची खाणारांची जीभ बदलली, मात्र सागर हॉटेलची चव कायम राहिली…
सदाशिवनगर येथे मांसाहारी भोजनासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या सागर हॉटेलचा १४ वा वर्धापन दिन.चवीने खाणार त्याला सागर हॉटेल देणार, आज सुद्धा हॉटेलचा दर्जा व चव कायम
सदाशिवनगर ( बारामती झटका )
सदाशिवनगर ता. माळशिरस येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंब असणारे सौ. ताई शिवाजी पालवे व श्री. शिवाजी नामदेव पालवे यांनी शेती करीतकरीत उद्योग व्यवसायाला दि. ११/११/२००८ साली ‘हॉटेल सागर’ या नावाने हॉटेल व्यवसायाचा सकाळी ११ वाजता शुभारंभ करून सुरुवात केलेली होती.
ग्राहकांच्या मनपसंत, आवडीचे, चवीचे, रुचकर व स्वादिष्ट जेवण देऊन ग्राहकांच्या मनावर अधिराज्य केलेले आहे. हॉटेल सागरमध्ये जेवण करण्याकरता आजोबा, मुलगा, नातू अशी तीन पिढ्या खाणाऱ्या माणसांची जीभ बदलली मात्र, सागर हॉटेलची चव कायम राहिलेली आहे.’चवीने खाणार त्याला सागर हॉटेल देणार’, आज सुद्धा हॉटेलचा दर्जा व चव कायम आहे.
सदाशिवनगर येथे मांसाहारी भोजनासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या सागर हॉटेलचा १४ वा वर्धापन दिन ११ सप्टेंबर २०२२ रोजी येत आहे.शिवाजी नामदेव पालवे यांनी प्रतिकूल परिस्थितीत हॉटेलची सुरुवात केलेली होती. १४ वर्षांपूर्वी पत्र्याच्या खोलीमध्ये शुभारंभ झालेला होता. आज त्या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षांमध्ये रूपांतर झालेले आहे. शिवाजीराव पालवे यांना सागर व सुहास दोन मुले आहेत.
लहानपणापासून प्रतिकूल परिस्थितीत मुलांनी शिक्षणाबरोबर आपल्या आई-वडिलांना शेतात व हॉटेलमध्ये मदत करण्याचे संस्कार अंगीकृत केलेले होते. सागर याने हॉटेल व्यवसाय पहात बीएससी शिक्षण पूर्ण केलेले आहे तर, सुहासची फार्मसी झालेला आहे. सध्या पूर्ण वेळ पालवे परिवार शेतीबरोबर हॉटेल व्यवसाय सांभाळत आहेत.हॉटेल सागरमध्ये घरगुती पद्धतीने जेवण बनवले जाते.
ग्राहकांच्या आवडीनुसार मनपसंत भोजनाचा आस्वाद राजकीय नेते, कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक, अधिकारी, व्यापारी त्यांच्यासह शेतकरी बांधव सागर हॉटेलमध्ये मनपसंत भोजनाचा आस्वाद घेत असतात.
हॉटेल सागर मध्ये माढा लोकसभेचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, भाजपचे सोलापूर जिल्हा संघटन महामंत्री शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील, राज्यमंत्री पदाचा दर्जा असणाऱ्या महामंडळाचे माजी अध्यक्ष आरपीआयचे नेते राजाभाऊ सरवदे, राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, इंदापूर खरेदी विक्री संघाचे प्रदीपमामा जगदाळे, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, इंजिनियर, वकील, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक पत्रकार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शेतकरी, दुग्ध व्यवसायिक, ऊसतोड वाहन मालक, चालक, कामगार सभासद शेतकरी बंधू अशा अनेक विविध क्षेत्रातील लोकांनी सागर हॉटेलच्या जेवणाची चव घेतलेली आहे.
१४ वर्षांमध्ये हॉटेलमध्ये जेवणारा व चवीने खाणारा एक सुद्धा सागर हॉटेलमध्ये जेवलेला नाही, असा सापडणे मुश्किल आहे. पालवे परिवार यांनी ग्राहक देवता म्हणून येणाऱ्या सर्व ग्राहकांच्या आवडीनुसार मनपसंत भोजनाचा आस्वाद दिलेला आहे. तोंडामध्ये साखर व डोक्यावर बर्फ ठेवून हॉटेलचा व्यवसाय करून आपली आर्थिक प्रगती केलेली आहे. सध्या सुसज्ज अशी इमारत उभी केलेली आहे. पुणे-पंढरपूर रोडवर सदाशिवनगर येथे सागर हॉटेल मोठ्या दिमाखात व डौलामध्ये पंधराव्या वर्षात ग्राहकांच्या सहकार्याने पदार्पण करीत आहेत. बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनेल परिवाराच्यावतीने हॉटेल सागर यांच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Fantastic article! Your perspective on this topic is truly insightful. For those looking to explore this further, I found an excellent resource that complements your points: READ MORE. I’m eager to hear what others think about this!
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
Ищите в гугле