चैतन्य जप प्रकल्पाच्या राज्यस्तरीय शिबिरात भव्य रक्तदान शिबिर संपन्न
जपकारांचे रामनामाने पवित्र झालेले रक्त गरजू रुग्णाला दिले तर, त्याच्या हृदयात रामनामाची ज्योत प्रज्वलित होईल – धैर्यशील देशमुख
कारुंडे (बारामती झटका)
कारुंडे ता. माळशिरस येथे चैतन्य जप प्रकल्पाच्या २२ व्या राज्यस्तरीय शिबिरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिराचे उदघाटन फलटण तालुका दूध संघाचे अध्यक्ष धनंजय पवार व कारुंडेचे माजी सरपंच अमर जगताप यांचे शुभहस्ते करण्यात आले. या आध्यात्मिक रक्तदान शिबिराचा हेतू विषद करतांना चैतन्य जप प्रकल्पाचे कार्याध्यक्ष धैर्यशील देशमुख म्हणाले की, सर्व जपकारांचे रक्त हे रामनामाने पवित्र झालेले असते व असे रक्त जर एखाद्या गरजू रुग्णाच्या शरीरात गेले तर त्याचा आजार तर बरा होईलच परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे त्या रुग्णाच्या हृदयात देखील रामनामाची ज्योत प्रज्वलित होईल. या उदात्त हेतूनेच सदर रक्तदान शिबीर आयोजित केले जाते.

लोंढेवस्ती येथील शिबिरात एकूण २१६ भाविक स्त्री-पुरुषांनी रक्तदान केले. सोलापूर येथील अक्षय ब्लड बँक व नातेपुते येथील ज्ञानदीप ब्लड बँक यांनी रक्त संकलित केले.
याप्रसंगी प्रकल्पाचे कार्याध्यक्ष धैर्यशील देशमुख, राजेंद्र महाराज मोरे, सरपंच अमोल पाटील, माजी सरपंच अमर जगताप, माजी उपसरपंच बापूराव लोंढे, हणमंत पाटील, अर्जुन काटे, राजेंद्र महाराज मोरे, सतीश बर्गे, विजय लोंढे, नितीन लोंढे, युवराज साळुंखे, सुरेश लोंढे, विजय मस्कर, प्रभाकर मस्कर, संजय गोसावी, तुषार पवार, नितीन वायाळ, ज्ञानदीप ब्लड बँकेचे हणमंत माने, संजय कोडलकर, आप्पा शेंडगे, ढोबळे सर, अक्षय ब्लड बँकेचे अजय रुपनवर, राजकुमार वाघमोडे आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng