Uncategorized

स्वातंत्र्य सैनिक मनोहरपंत चिवटे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांना प्रदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

करमाळा (बारामती झटका)

स्वातंत्र्य सैनिक मनोहरपंत चिवटे यांच्या स्मरणार्थ आरोग्य क्षेत्रात जनजागृती पर लिखाण करणाऱ्या पत्रकारांना देण्यात येत असलेला यावर्षीचा मानाचा पुरस्कार दैनिक लोकसत्ताचे मुंबई प्रतिनिधी संदीप आचार्य यांना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड येथे आयोजित अधिवेशनात देण्यात आला. मानचिन्ह शाल श्रीफळ व 25000 रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी व्यासपीठावर खा. श्रीरंग बारणे, आ. महेश लांडगे, आ. रोहितदादा पवार, आ. आदिती तटकरे, पत्रकार मिलिंद भागवत, विलास बडे, अश्विन बापट, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष विनोदजी जगदाळे, रेश्मा साळुंखे, अनुपमा खानविलकर, निकिता पाटील, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुख, पत्रकार रवी आंबेकर, समीर वावळणेकर आदींसह पत्रकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी करमाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
संदीप आचार्य हे दैनिक लोकसत्ता मधून सातत्याने आरोग्य विषयक लेखन करून जनजागृती करत आहेत. त्यांनी निर्माण केलेले अनेक प्रकल्प आरोग्य खात्याने स्वीकारलेले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचावी म्हणून त्यांनी केलेला रोड मॅप महाराष्ट्र शासनाने स्वीकारला आहे. या सर्व त्यांच्या कामाची दखल घेऊन मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य यांनी त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

या पुरस्कारानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संदीप आचार्य यांना मी गेली तीस-पस्तीस वर्षापासून ओळखत असून त्यांनी आरोग्य क्षेत्रात आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृतीचे मोठे काम केले आहे. आज मराठी पत्रकार परिषदेने आरोग्य विषयावर लिखाण करणाऱ्यांना पुरस्कार देणे हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.

यावेळी वैद्यकीय सहाय्यता मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आरोग्य क्षेत्रात जे महत्त्वाचे निर्णय घेतले त्याची माहिती देऊन यापुढील काळात महाराष्ट्रातील कुठल्याही रुग्णाला मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकल्प केला असल्याचे सांगितले.

आरोग्य क्षेत्रातील लिखाण अत्यंत महत्त्वाचे असून या लिखाणामुळे सर्वसामान्य अडचणीत असणाऱ्या रुग्णाला योग्य मार्गदर्शन सल्ला व मदत मिळते. आजचा पुरस्कार खऱ्या अर्थाने रुग्णांसाठी जे संवेदनशील म्हणून ओळखले जातात. अशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळाला, त्यामुळे या पुरस्काराचा माझ्या दृष्टीने मला वेगळा अभिमान आहे. – संदीप आचार्य पुरस्कार प्राप्त पत्रकार

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

  1. This piece really resonated with me. The analysis was spot-on. Looking forward to discussing this with you all. Check out my profile for more interesting cont

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button