Uncategorized

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे लाभ घ्या – सतिश कचरे, मंडळ कृषि अधिकारी

नातेपुते (बारामती झटका)

राज्यात पर्जन्य आधारीत शेतीसाठी पाणलोटावर आधारीत जलसंधारणाच्या उपाययोजनाद्वारे पाण्याची उपलब्धता वाढविणेसाठी महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना अंतर्गत शेततळे योजना राबवित आहे. मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे पाणी ओढे, नाले याद्वारे वाहून जाणारा अतिरिक्त अपधाव उपसून त्याची साठवन करण्याकरीता शेतावर शेततळ्यासारखी पायाभुत सुविधा उभारण्यास व उत्पादन वाढीस याद्वारे मदत होणार आहे.

योजना पात्रता अटी – १. शेतकऱ्यांचे नावे ०.६० हे. क्षेत्र असणे आवश्यक आहे. २. जागा तांत्रिक दृष्ट्या योग्य व वाहून जाणारे पाणी साठविण्यास व पूनर्भरण करीता योग्य असणे गरजेचे आहे. ३. लाभार्थींनी यापूर्वी कुठल्याही योजनेतून याचा लाभ घेतलेला नसावा. ४. जागा निवडताना पाणी पाझराचे प्रमाण कमी असणारी चिकण काळी माती प्रमाण जास्त असणारी जमिन निवडावी. ५. नालापात्र ओहोळमध्ये शेततळे घेता येणार नाही. ६. ३% पेक्षा कमी उतार असणाऱ्या जलपरिपूर्ण झालेल्या पाणलोटात, टंचाईग्रस्त लाभक्षेत्रात प्राधान्याने घेण्यात यावे. ७. सभोवतालची जामिन चिबड होणार नाही, इतर कोणाचीही स्थावर व जंगम मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची खात्री करून जागा निवड करावयाची आहे.

याद्वारे शेतकरी इनलेट आऊटलेट खोदाई व सिल्ट टॉपसह शेततळे व इनलेट आऊटलेट सह सिल्ट ट्रॅप विरहीत तळेसाठी माहाडीबीटी पोर्टल वर https://mahadbt mahiti.gov.in वर २३.६० रु. भरून ३४ x ३४ मी., ३० x ३० मी., ३० x २५ मी., २५ x २५ मी., २५ x २० मी., २० x २० मी., २० x १५ मी. व १५ x १५ मी‌. या सर्वांसाठी खोली ३ मी. साठी इनलेट आऊटलेट सिल्ट ट्रॅप सह किंवा विरहीतला अर्ज करण्याचे अहवाल मंडळ कृषि अधिकारी नातेपुते कार्यालयाने केले आहे. या योजनेतून आकारमान व प्रकार नुसार १५,७१७ ते ७५,००० रु. अनुदान उपलब्ध आहे. व येणारा अतिरिक्त खर्च स्वतः लाभार्थीने करण्याचे व जागा उपलब्ध करून देण्याचे बंधन आहे.

माळशिरस तालुक्यासाठी अनुसूचित जातीसाठी ३ व सर्वसाधारण साठी ३८ चा लक्षांक उपलब्ध आहे. यातील ३०% निधी महिला खातेदार व ५% निधी दिव्यांग खातेदार साठी उपलब्ध असणार आहे. तरी अधिकचे महितीसाठी नजीकचे कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन मंडळ कृषि अधिकारी नातेपुते कार्यालयाने केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

8 Comments

Leave a Reply

Back to top button
14:11