समाजप्रबोधनकार ह.भ.प. समाधान महाराज शर्मा, बीड यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे.
स्व. वस्ताद बाजीराव देशमुख यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस पंचक्रोशीतील कुस्ती क्षेत्रातील बुजुर्ग व्यक्तिमत्व स्वर्गीय वस्ताद बाजीराव बाबासो देशमुख यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त बुधवार दि. 23/11/2022 रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये समाज प्रबोधनकार ह.भ.प. श्री. समाधान महाराज शर्मा, बीड यांचे सुश्राव्य कीर्तन 61 फाटा माळशिरस येथे होणार आहे. कीर्तनानंतर पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी सदर कार्यक्रमास मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब एकनाथ देशमुख, नगरसेविका सौ. अर्चना आप्पासाहेब देशमुख, नगरसेवक श्री. विजय बाजीराव देशमुख, सौ. शोभा प्रताप देशमुख, श्री. प्रताप बाजीराव देशमुख, सौ. प्रियंका शामराव देशमुख, श्री. शामराव बाजीराव देशमुख, श्रीमती सुरेखा बाजीराव देशमुख, माजी नगराध्यक्षा सौ. द्रोपदी बाजीराव देशमुख आणि समस्त देशमुख परिवार यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

वस्ताद बाजीराव देशमुख आणि देशमुख परिवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मित्र परिवार व नातेवाईक यांना हस्ते परहस्ते आमंत्रण व निमंत्रण दिलेले आहे. नजरचुकीने व चुकून कोणी राहिलेले असेल तर हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे माळशिरस नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉ. अप्पासाहेब देशमुख व नगरसेवक वस्ताद विजयराव देशमुख यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
