इस्लामपूर ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण, वार्डनिहाय सदस्य संख्या व एकूण मतदारांची संख्या…
इस्लामपूर (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठी दि. १८/१२/२०२२ रोजी मतदान होणार आहे. तालुक्यातील इस्लामपूर येथे ४ वार्ड असून १५३६ पुरुष आणि १४८९ स्त्री असे एकूण ३०२५ एवढे मतदार आहेत. इस्लामपूर ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे.
वार्ड क्र. १ मध्ये अनुसूचित जाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ७८२ मतदार आहेत.
वार्ड क्र. २ मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ६९३ मतदार आहेत.
वार्ड क्र. ३ मध्ये अनुसूचित जाती स्त्री आणि सर्वसाधारण स्त्री असे दोन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ६१७ मतदार आहेत.
वार्ड क्र. ४ मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ९३३ मतदार आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.
Great job on this article! It was very engaging and informative. I’m eager to hear different viewpoints on this. Click on my nickname for more engaging content.