Uncategorized

ग्रामीण भागातील रुग्णांना मदत मिळवून देणे पुण्याचे काम – सहकार आयुक्त अनिल कवडे

करमाळा ( बारामती झटका )

ग्रामीण भागातील रुग्णाला मोठी शस्त्रक्रिया किंवा मोठ्या खर्चाचा आजार झाला तर ते संपूर्ण कुटुंब हतबल होते. अशा परिस्थितीत रुग्णाला मदतीचा आधार देऊन त्याला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे व मोफत उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे ही महत्त्वाची जबाबदारी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पार पाडत आहे, ही समाधानाची बाब आहे, असे मत सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी व्यक्त केले. आज ते करमाळा दौऱ्यावर असताना शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. स्वातंत्र्यसैनिक मनोहर पंत चिवटे संचलित श्री कमला भवानी ब्लड बँक व श्री कमला भवानी डायलिसिस सेंटरची पाहणी केली. यावेळी अप्पर निबंधक सहकारी संस्था शैलेश कोतमीरे, सहकार निबंध पुणे विष्णू डोके, सहाय्यक निबंध दिलीप तिजोरी आदी उपस्थित होते.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, युवा सेना शहरप्रमुख विशाल गायकवाड, नागेश गुरव, भारतीय जनता पार्टीचे जगदीश अग्रवाल, नागेश शेंडगे, वैद्यकीय कक्ष प्रमुख रोहित वायबसे, मारुती भोसले, संजय जगताप, आजिनाथ इरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अनिल कवडे म्हणाले की, सध्या कॅन्सर, हार्ट अटॅक, बायपास सर्जरी यांसह मोठे आजार रुग्णात दिसून येत आहेत. अशावेळी अडचणीत असलेल्या रुग्णांना योग्य मार्गदर्शन देणे, शासन मान्यता प्राप्त हॉस्पिटलमध्ये दाखल करणे, शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देणे, याशिवाय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता पक्षाचा निधी मिळवून देणे, त्याचप्रमाणे पंतप्रधान निधी, सिद्धिविनायक ट्रस्टचा निधी अनेक प्रसन्नधी मिळून देण्यासाठी रुग्णाला मदत करणारी यंत्रणा करमाळ्यात उभी केली आहे ही आनंदाची गोष्ट आहे. करमाळा सारख्या ठिकाणी ब्लड बँक व डायलिसिस सेंटर उभा करणे हे नुकसानीचे काम सुद्धा वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून जोरदार सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी सचिव बबनराव मेहर, प्राध्यापक अशोकराव नरसाळे, पत्रकार नासिर कबीर यांनीही श्री. अनिल कवडे यांचा सत्कार केला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Back to top button