पत्रकार सुरक्षा समितीच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी सुजित सातपुते यांची अधिकृत नियुक्ती..!
पिलीव (बारामती झटका)
पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, पत्रकारांसाठी घरकुल योजना, विमा योजना, यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती, राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता, पत्रकारावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याची चौकशी, राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले, धमकी, मारहाण, त्याच बरोबर कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसास मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत यासह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने वारंवार आंदोलन, उपोषण, निवेदन देऊन पत्रकारांचे प्रश्न सोडवणाऱ्या पत्रकार सुरक्षा समितीच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदी माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील साप्ताहिक माळशिरस टाइम्सचे मुख्य संपादक सुजित दिगंबर सातपुते यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
सुजित सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील वंचित पिढीत व सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी माळशिरस टाइम्सच्या माध्यमातून नेहमीच आवाज उठवून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सुजित सातपुते युवा व धाडसी पत्रकार असून निरपेक्ष, निर्भीड लेखणी त्यांचा मूळ स्वभाव असून त्यांच्या निवडीने माळशिरस पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांना पुढील कार्यास प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, राज्य सचिव डॉ. आशिषकुमार सुना, मराठवाडा विभाग अध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे, कार्याध्यक्ष यशवंत कुलकर्णी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे, कार्याध्यक्ष अप्पासाहेब कर्चे, उपाध्यक्ष बळीराम पवार, ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज जैन, सोलापूर जिल्हा अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार, परभणी जिल्हा अध्यक्ष नागेश नागठाणे, कार्याध्यक्ष शेषराव सोपने, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष राम राठोड, सुवर्णाताई सुना जिल्हा अध्यक्ष सोलापूर (महिला विभाग), सोलापूर जिल्हा संघटक दत्तात्रय पवार, सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख कादर शेख, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सादिक शेख यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng