माळशिरस तालुक्यात लोकनियुक्त थेट जनतेतील बिनविरोध सरपंच राजाराम झुरळे यांना बहुमान मिळाला.
माळशिरस तालुक्यातील थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदी नेवरे ग्रामपंचायतचे राजाराम संभाजी झुरळे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड झाली आहे.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदी नेवरे गावचे राजाराम संभाजी झुरळे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड झालेली आहे.
नेवरे गावचे बिनविरोध सरपंच करण्यामध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे संचालक श्री सुरेश राजेंद्र पाटील पोलीस पाटील श्री पांडुरंग पाटील,श्री सुहास बाळकृष्ण पाटील, श्री अर्जुन गोवर्धन व्यवहारे, श्री प्रताप ज्ञानोबा गाडेकर, श्री विजयानंद अंकुश कारंडे, श्री अंकुश दर्याबा पाटील, श्री कल्याण तुकाराम कदम, श्री विलास गजेंद्र पाटील, एडवोकेट शहाजी लालासो भोसले यांनी विशेष सहकार्य करून सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची निवडणूक बिनविरोध केलेली आहे.

अमोल कारंडे यांचा सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज होता गावांमधील सर्व गट तट मतभेद व राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन अमोल कारंडे यांना दोन वर्षानंतर पुढील तीन वर्षाचा सरपंच पदाचा कालावधी सर्वानुमते ठरलेले आहे.

नेवरे ग्रामपंचायत मध्ये सरपंच राजाराम संभाजी झुरूळे वार्ड क्रमांक एक साठे नितीन मुरलीधर कुंभार संपत महादेव पाटील सोनाली गजानन वार्ड क्रमांक दोन बोबडे बापूराव लक्ष्मण कदम सविता नवनाथ मंडले सुरवंता तानाजी वार्ड क्रमांक तीन पाटील सुरेश गजेंद्र पाटील लता मुकुंद कदम प्रमिला बाळासाहेब असे सर्व सरपंच व सदस्य बिनविरोध झालेले आहेत माळशिरस तालुक्यात थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये चुरस व रंगत असताना नेवरे गावच्या सर्व नेते कार्यकर्ते व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन माळशिरस तालुक्यामध्ये नेवरे गावाचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीने सर्वांनी निर्णय घेतलेला आहे नेवरे ग्रामपंचायत बिनविरोध सरपंच व सदस्य यांची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केल्यानंतर सर्वांनी आनंद उत्सव साजरा केला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng