खंडाळी दत्तनगर ग्रामपंचायतीच्या वार्ड क्र. १ मध्ये प्रचारात आघाडी, मतदारांचा वाढता पाठिंबा.
सरपंच पदाचे उमेदवार सुरवसे सुनिता सुरेश, ग्रामपंचायत सदस्य पदाचे खटके श्रीनाथ खंडू, चव्हाण स्वाती संभाजी, भोसले जयश्री शाहू यांचा होम टू होम प्रचार सुरू…
खंडाळी ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील खंडाळी दत्तनगर येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील प्रणित खंडाळी दत्तनगर समविचारी ग्रामविकास आघाडी पॅनल मधून थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदाच्या अधिकृत उमेदवार सुरवसे सुनीता सुरेश यांचे चिन्ह कपबशी आहे. तर वार्ड क्र. १ मधील ग्रामपंचायतचे सदस्य पदाचे अधिकृत उमेदवार खटके श्रीनाथ खंडू यांचे चिन्ह शिलाई मशीन, चव्हाण स्वाती संभाजी यांचे चिन्ह रिक्षा, भोसले जयश्री शाहू यांचे चिन्ह छताचा पंखा हे असून यांनी वार्डामध्ये होम टू होम प्रचार करून प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे. त्यांना मतदारांचा दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे.



खटके श्रीनाथ खंडू यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची सेवा केलेली आहे. अनेक लोकांना शासनाचे लाभ मिळवून दिलेले आहेत. सर्व समावेशक असणारे खटके यांनी वार्डातील प्रत्येक घरामध्ये जाऊन चव्हाण स्वाती संभाजी व भोसले जयश्री शाहू यांना सोबत घेऊन प्रचारांमध्ये आघाडी घेतलेली आहे. दिवसेंदिवस मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng