Uncategorizedताज्या बातम्या

धक्कादायक बातमी : माळशिरस तालुक्यातील पांढरपेशी यांनी भक्त निवासाचे आलिशान घर बांधून केला गृहप्रवेश

देवाच्या भक्तांसाठी भक्तनिवास, मात्र राजकीय नेत्यांच्या भक्ताने स्वतःचे घर बांधण्याचा प्रकार समोर आलेला आहे.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. तालुक्यातील पांढरपेशी याने भक्त निवासाचे आलिशान घर बांधून मोठ्या थाटामाटात नेतेमंडळींना बोलावून गृहप्रवेश केला आहे. काही वर्षांपूर्वी देवाच्या भक्तांसाठी बसण्यासाठी व आराम करण्यासाठी सोय व्हावी यासाठी भक्त निवास बांधण्यात आलेले होते. मात्र, राजकीय नेत्यांच्या भक्ताने स्वतःचे घर बांधण्याचा प्रकार समोर आला असून गावामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे.

माळशिरस तालुक्यात काही वर्षांपूर्वी मंदिराच्या ठिकाणी पंचायत समितीच्या बांधकाम विभागातून निधी उपलब्ध करून भक्तनिवास बांधलेले आहे. भक्त निवासाच्या नावाखाली एका पांढरपेशी व्यक्तीने स्वतःचे घर बांधून मोठ्या थाटामाटात गृहप्रवेशाचा कार्यक्रम केलेला आहे, याची चर्चा गावासह तालुक्यात सुरू झालेली आहे. भक्त निवासाच्या बांधकामासाठी किती निधी आला व त्याचा वापर भक्त निवासासाठी झाला आहे की नाही, बांधत असताना भक्तनिवास घर बांधण्याच्या उद्देशानेच बांधले आहे की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सदरच्या वास्तुशांतीला पंचायत समिती मधील अधिकारी व कर्मचारी सुद्धा गेलेले असणार आहेत. प्रशासनाच्या कसे लक्षात आले नाही, याचाही सवाल गावामध्ये व तालुक्याच्या चर्चेतून समोर येत आहे. सदरचे भक्तनिवास कोणत्या फंडातून व किती रकमेचे होते, सदरचे बांधकाम कोणत्या कालावधीमध्ये झालेले होते, बांधकाम हस्तांतरित करीत असताना ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक कोण होते, याची सर्व माहिती उपलब्ध करण्याचे काम सुरू आहे. माहिती गावासह पांढरपेशी व्यक्तीची माहिती वाचकांना दिली जाईल तोपर्यंत वेट आणि वॉच मध्ये राहावे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button