मतदारांनी संधी दिल्यास गावाचा झकास विकास करेन – थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदाच्या उमेदवार सौ.. विजया रामदास गायकवाड
प्राथमिक स्वरूपात सात नवीन शिधापत्रिकांचे वाटप करून माळेवाडी (बो.) ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा शुभारंभ
बोरगाव ( बारामती झटका)
माळेवाडी (बोरगाव) ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक २०२२-२०२७ करिता स्वाभिमानी पक्ष पुरस्कृत जनतेतून सरपंच पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. विजया रामदास गायकवाड (चिन्ह – नारळ) यांच्या प्रचाराचा शुभारंभ दुपारी १२:०० वाजता नारळ फोडून करण्यात आला.
यावेळी प्रथम सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन युवा नेते प्रतिक (भैय्या) पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवराम गायकवाड, जेष्ठ मार्गदर्शक दत्तात्रय (आप्पा) एकतपुरे, महादेव पवार, रामदास गायकवाड (महाराज), सिध्दनाथ एकतपूरे आणि महिला प्रतिनिधी यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून नारळ फोडण्यात आला.
गेल्या महिन्यात काही महिलांनी रेशनकार्ड नसल्यासंबंधी मागणी केली होती. नंतर त्यांना तात्काळ उपलब्ध करून देण्याचे ठरले. त्यानुसार त्यांना सौ. विजया रामदास गायकवाड यांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी महिलांना प्राथमिक स्वरूपात सात नवीन रेशनकार्ड वाटप करून प्रचाराचा शुभारंभ करून नारळ फोडण्यात आला.
यावेळी त्या म्हणाल्या की, आजपर्यंत महिला बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांना कर्जपुरवठा करून त्यांना उद्योग, व्यवसाय संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच खंडाळी व बोरगाव या दोन गावात पारदर्शक महिलांचे नियंत्रणाखाली सुरु असलेले पारदर्शक सुसज्ज दूध केंद्र सुरू करण्यात आले आहे. महिलांना लागू होणाऱ्या शासकीय योजना एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सेवा केंद्र सुरू करण्याचा मानस आहे. अजून काही गावातील नागरिकांच्या व महिलांच्या अडचणी व रेशनकार्ड संबंधित कोणत्याही समस्या असु द्या, त्या सोडवल्या जातील, यासाठी महिलांनी पुढे यावे. तसेच मतदारांनी संधी दिल्यास गावाचा कायापालट करून झकास विकास करेन, असे जाहीर आवाहन जनतेतून लोकनियुक्त सरपंच पदाच्या उमेदवार सौ. विजया रामदास गायकवाड यांनी केले आहे.
यावेळी रामदास गायकवाड (महाराज), लक्ष्मण गायकवाड आणि सर्वच महिला बचत गटांच्या भगिनी, गावातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng