सोलापूर जिल्ह्यातील १७७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ८१.१९% मतदान
३ लाख ८३ हजार १३ मतदारांनी बजावला मतदानाचा अधिकार
सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्यातील १७७ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्यत्व पदांसाठी रविवारी त्या त्या ठिकाणी मतदान घेण्यात आले. ८१.१९% इतके मतदान झाले. सर्वात अधिक मतदान पंढरपूर तालुक्यात (८७.०३%) झाले. निवडणुकीत ३ लाख ८३ हजार १३ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.
दरम्यान, सर्वच आघाड्यांनी विजयाचा दावा केला असला तरी विजयी गुलाल कोण उधळणार ? हे मात्र मंगळवारी स्पष्ट होणार आहे. मतदान व मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. मतमोजणीनंतर विजयी मिरवणूक काढण्यास व जल्लोष करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
एकूण ६६८ केंद्रांवर मतदान केंद्रांवर मतदान झाले. जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींपैकी १५ सरपंच व ३२९ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित १७७ ग्रामपंचायती व १४१७ सदस्यांसाठी ६६७ मतदान केंद्रांवर रविवार दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान झाले.
ग्रामपंचायती निवडणुकीसाठी करमाळा ८३, माढा ३२, बार्शी ५७, उत्तर सोलापूर ५७, मोहोळ ३०, पंढरपूर ३५, माळशिरस १५९, सांगोला २१, मंगळवेढा ४९, दक्षिण सोलापूर ७१, अक्कलकोट ७३ याप्रमाणे एकूण ६६८ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती.
प्रत्येक मतदान केंद्रावर एक अधिकारी, केंद्राध्यक्ष, एक मतदार यादी तपासणी कर्मचारी, निरीक्षक, एक शिपाई अशा पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. जिल्हास्तरावरून महसूल उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी तर तालुकास्तरावर संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला.
७ पोलीस उपाधीक्षक, १३ पोलीस निरीक्षक, ५५ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, ६४५ पोलीस अंमलदार, १००० होमगार्ड, १०० जणांची एक राज्य राखीव पोलीस बलाची तुकडी, दंगा नियंत्रण पथक व जलद प्रतिसाद पथकाची प्रत्येकी एक तुकडी असा तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
तालुका निहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी,
एकूण मतदार कंसात झालेले मतदान
करमाळा ८२.४६% एकूण मतदान ३८७०७ (३१९१६)
माढा ८१.४१% एकूण मतदान १९१८२ (१५६१७)
बार्शी ८३.२८% एकूण मतदान २२७९१ (१८९८१)
उत्तर सोलापूर ७९.४८% एकूण मतदान ३०८६६ (२४५३२)
मोहोळ ८४.१७% एकूण मतदान १६५१६ (१३९०१)
पंढरपूर ८७.३% एकूण मतदान १९४१२ (१६८९४)
माळशिरस ८०.०२% एकूण मतदान १०७६७२ (८६१५८)
सांगोला ८२.६३% एकूण मतदान १४२०५ (११७३७)
मंगळवेढा ८४.३८% एकूण मतदान २९९३९ (२५२६४)
दक्षिण सोलापूर ७८.२८% एकूण मतदान ४७०२५ (३६८१३)
अक्कलकोट ७९.३०% एकूण मतदान ३३४१७ (२६५००)
एकूण ८१.१९% एकूण मतदार ३७९७३२ (३०८३१३)
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good. https://www.binance.info/zh-CN/join?ref=S5H7X3LP
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
Very engaging and funny! For more on this topic, visit: LEARN MORE. Let’s chat!