विजया मारकड यांचा थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणुकीत विक्रम
मारकडवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार सौ. विजया जिजाबा मारकड ८८% मतदान घेऊन विक्रमी मताने विजयी
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत १८८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. जनतेतून थेट सरपंच या पदासाठी दोन उमेदवार उभे राहिले होते. समोरासमोर दुरंगी सामन्यांमध्ये मारकड परिवाराच्या तुळजाभवानी समस्त ग्रामस्थ पॅनलच्या
सौ. विजया जिजाबा मारकड या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. त्यांना या निवडणुकीमध्ये १६६६ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी सौ. इंदुबाई भिवा वळकुंदे यांना २०२ मते मिळाली आहेत. तर नोटा १७ असे मतदान झाले. यामध्ये १४६४ मतांच्या फरकाने सौ. विजया जिजाबा मारकड या विजयी झाल्या आहेत.
एकूण मतदानापैकी त्यांनी ८८% मतदान मिळवले आहे. एवढे मताधिक्य घेणाऱ्या थेट जनतेतील सरपंच पदाच्या निवडणुकीतील पहिल्या उमेदवार असणार आहेत.
विजयी उमेदवाराच्या पॅनलने तीन सदस्य पदाच्या जागा बिनविरोध करून ३ सदस्य निवडून विजयाची सलामी दिली होती. यानंतर बाकीचे ८ उमेदवार खूप मोठ्या फरकाने विजयी होऊन त्यांनी ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
सौ. विजया मरकड यांचे चिन्ह कपबशी होते. सौ. इंदुबाई वळकुंदे यांचे छत्री चिन्ह होते. वार्ड क्र. १ मध्ये कपबशी ४१७, छत्री २७, नोटा ११ एकूण मतदान ४५५, वार्ड क्र. २ कपबशी ३७३, छत्री २४, नोटा २, एकूण मतदान ३९९ वार्ड क्र. ३ कपबशी ३५४, छत्री ७९, नोटा २, एकूण मतदान ४३५, वार्ड क्र. ४ कपबशी ५२२, छत्री ७२, नोटा २, एकूण मतदान ५९६ असे एकूण मतदान १८८५ पोल झालेले होते. त्यापैकी सौ. विजया मारकड यांना १६६७ मते, सौ. इंदुबाई वळकुंदे यांना २०२, नोटा १७ असे मतदान झालेले आहे.
गतवेळच्या निवडणुकीत मारकड परिवारातील सदस्याचा थेट जनतेतील सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभव झालेला होता. पराभवाने खचून न जाता पाच वर्ष जनतेची कामे व अडीअडचणीला उपयोगी पडून गावातील मतदारांची मने जिंकलेली होती. त्यामुळे सौ. विजया मारकड यांना व पॅनल मधील सर्व सदस्यांना मोठ्या फरकाने निवडून दिलेले आहे.
निवडणुक निकालानंतर् मारकडवाडी ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला. ग्रामस्थांनी सरपंच व सर्व सदस्यांची अभिनंदन केले. विजयी उमेदवारांनी ग्रामस्थांचे आभार मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This piece was both informative and amusing! For more, visit: LEARN MORE. Keen to hear everyone’s views!