ग्राहक कायद्याचा प्रसार समाजामध्ये व्यापक स्वरूपात होण्याची गरज – श्रीकांत बाविस्कर
नातेपुते (बारामती झटका)
तहसील कार्यालय माळशिरस, ग्राहक पंचायत महाराष्ट्र माळशिरस, अखिल भारतीय ग्राहक पंचायत माळशिरस यांच्या संयुक्त विद्यमाने २४ डिसेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. या वेळी स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा पूजन महाराष्ट्र विद्युत नियमक आयोगाचे बारामती विभागाचे सदस्य व सोलापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य श्रीकांत बाविस्कर व पुरवठा अधिकारी चंद्रकांत लोखंडे,सुशांत केमकर, व आखील भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष उपेंद्र केसकर यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात ग्राहक तक्रार निवारण चे स्वतंत्र सदस्य बारामती परिमंडळ श्रीकांत बाविस्कर यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचा प्रसार व प्रचार सर्व जनतेमध्ये व्यापक स्वरूपात होण्याची आज नितांत गरज असल्याचे सांगितले. व विद्युत महामंडळाबद्दल आपल्या काही तक्रार असल्यास ग्राहक गाऱ्हाणे निवारण कक्ष (C.G.R.F.), तक्रार निवारण केले जाते असे सांगितले.

याप्रसंगी उपेंद्र केसकर, ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे माळशिरस तालुका अध्यक्ष डॉ. दत्तात्रय थोरात, ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य भगवान घुगरदरे यांनी ग्राहक चळवळीची माहिती दिली. उपेंद्र केसकर यांनी नवीन ग्राहक कायदा व ग्राहक चळवळ २०१९ अंतर्गत सुरक्षितता, माहिती अधिकार, निवड करण्याचा हक्क, म्हणणे मांडण्याचा हक्क, तक्रार निवारण हक्क व ग्राहक सजगता याविषयी माहिती सांगून आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका उपाध्यक्ष दस्तगीर मुलाणी, ग्राहक पंचायत महाराष्ट्र माळशिरस तालुका संघटक पुष्कर घुगरदरे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका संघटक अमित पुंज, उपाध्यक्ष वामनराव वाघमोडे, सचिन पवार, सचिन इंगळे, धोंडीराम म्हस्के, संजय हुलगे, मजहर मणेरी, अमीर तांबोळी, धाईंजे सर आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महादेव भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन उपेंद्र केसकर यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng