माळशिरस तालुक्यातील विरोधकांची वज्रमूठ म्हणजे गळती मोट, मोहिते पाटील गटाचे सायपनद्वारे हिरवेगार.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मोहिते पाटील पारंपारिक विरोधक एकवटले होते.
अकलूज ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील गट व पारंपारिक मोहिते पाटील विरोधी गट अशा निवडणूक होत असतात. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील मोहिते पाटील पारंपारिक विरोधक एकवटलेले होते. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झालेले होते मात्र, माळशिरस तालुक्यातील विरोधकांची वज्रमूठ म्हणजे गळती मोट असल्यासारखे आहे कारण, नुसता कालवा होतो, हाताला काही लागत नाही. भरण काही होत नाही. याउलट, मोहिते पाटील गटाचे सायपनद्वारे भरण होऊन हिरवेगार रान पाहावयास मिळत असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.
माळशिरस तालुक्याच्या राजकारणात आतापर्यंत मोहिते पाटील गटाने वर्चस्व ठेवलेले आहे. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत, सोसायटी दूध संस्था याचबरोबर पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, दूध संघ, साखर कारखाने, सूतगिरणी अशा अनेक संस्थांवर सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील त्यांच्यापासून आज तिसरी पिढी विविध संस्थांवर कार्यरत आहे. माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील यांच्या विरोधामध्ये सहकार महर्षी यांच्यापासून मोठा गट आहे. मात्र निवडणुकीतून मोहिते पाटील यांनी विरोधकांच्या दुफळीचा फायदा घेऊन राजकारणात कायम यशस्वी ठरलेले आहे. पंचायत समितीच्या स्थापनेपासून निवडणुकीत एक वेळच विरोधी गटाला उपसभापती पद मिळालेले होते. दुसऱ्या वेळेला पंचायत समिती सदस्य फुटाफुटीतून अडीच वर्ष उपसभापती व अडीच वर्ष सभापती व उपसभापती असा कार्यकाल सोडला तर माळशिरस तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांवर मोहिते पाटील गटाचे वर्चस्व राहिले आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गतवेळच्या निवडणुकीत ग्रामपंचायत गटातून विरोधी गटाचे सदस्य थोड्याफार फरकाने पराभूत झालेले होते. यंदाच्या निवडणुकीसाठी मोहिते पाटील पारंपारिक विरोधी गट एकत्र येऊन वज्रमूठीने एकवटले असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे. एकाच व्यासपीठावर आलेले विरोधक मनाने व विचाराने आलेले आहेत का ?, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
विरोधी गटामध्ये एकोपा नसल्याने मोहिते पाटील गटाला फायदा होत आहे. पूर्वीच्या काळी मोटद्वारे शेतीला पाणी दिले जात होते. मोट जीर्ण किंवा गंजलेली असली तर त्यामधून पाण्याची गळती होऊन शेतातील भरणे होत नसत. मात्र मोट सुरू असताना कालवा गोंधळ मोठ्याने होत असतो. तसाच प्रकार माळशिरस तालुक्यातील विरोधकांची वज्रमुठ म्हणजे गळती मोट असल्यासारखी आहे. मोकळा कालवा होणार आणि मोहिते पाटील गटाचे सायपन सारखे न कालवा गोंधळ होता भरणे होऊन हिरवेगार रान होणार, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील पारंपारिक विरोधकांनी एकवटलेली वज्रमूठ अधिक घट्ट होते का ?, मोहिते पाटील गट ढिली करण्यामध्ये यशस्वी होतात, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.