पिसेवाडी येथील मुरलीधर रामहरी गायकवाड यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
पिसेवाडीचे पोलीस पाटील सुमंत मुरलीधर गायकवाड पाटील यांना पितृशोक.
पिसेवाडी (बारामती झटका )
पिसेवाडी ता. माळशिरस येथील मुरलीधर रामहरी गायकवाड यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी अल्पशा आजाराने बुधवार दि. 04/01/2023 रोजी दुपारी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. पिसेवाडीचे पोलीस पाटील सुमंत मुरलीधर गायकवाड पाटील यांचे वडील होते. त्यांच्यावर रात्री उशिरा पिसेवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुरलीधर गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्मचारी म्हणून नोकरी केलेली होती. मळोली येथील शाखेत त्यांनी बरीच वर्ष नोकरी केलेली होती. ते सध्या सेवानिवृत्त आहेत. त्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पुणे-पंढरपूर रोडवर पिसेवाडी हद्दीत शुद्ध शाकाहारी सद्गुरु हॉटेल सुरू केलेले आहे.

मुरलीधर यांचा सुसंस्कृत स्वभाव, साधी राहणी, उच्च विचारसरणी, मनमिळावू स्वभावाचे होते त्यांच्या दुःखद निधनाने गायकवाड परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. ईश्वर दुःखातून सावरण्याचे बळ देवो व मृतात्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng