Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

लालमहाल ते वढू तुळापुर व्हाया… नागपुर अधिवेशन

कुर्डूवाडी (बारामती झटका) (पत्रकार हर्षल बागल यांच्या लेखनीतुन)

“… यांची पुस्तके भाजप जाळायचं धाडस दाखवणार का ?” छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षाही दहा पट तापदायक आहे, असे औरंगेजब स्वतः म्हणतो. राजे शिवाजीच्या या संभाजीला एक नाही तर, तब्बल सोळा भाषा बोलता येतात लिहिता येतात, अशी नोंद औरंगेजबाचा इतिहास लेखन करणारा काफीखान लिहितो. अनेक इंग्रजी पत्रे देखील पुरावे म्हणुन उपलब्ध आहेत. स्वराज्याचा शत्रु देखील छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मरताना गौरवाचे शब्द काढतो. पण राष्ट्रीय स्वयं संघाचे संघचालक गोळवलकर त्यांच्या बंच ऑफ थॉट्स या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल गलिच्छ लेखन करतात. वि. दा सावरकर देखील हिंदुपत पातशाही, सहा सोनेरी पाने या पुस्तकात छत्रपती संभाजी राजेंना दारुड्या व बाईलवेडा म्हणतात. राजसन्यासमध्ये रा. ग. गडकरी हे संभाजी महाराजांवर गलिच्छ लिहतात. भालजी पेंढारकर या निर्मात्याने मोहित्यांची मंजुळा व थोरांताची कमळा या चित्रपट नाटकातुन संभाजी महाराजांची बदनामी केली. त्याच भालजी पेंढारकर यांचा मराठ्यांनी १९४८ रोजी कोल्हापुर मध्ये स्टुडियो पेटवला होता. वरिल सर्वांनी संभाजी महाराजांची न बोलता येईल अशी गलिच्छ भाषेत बदनामी केली. गोळवलकर, सावरकर, गडकरी, राजवाडे यांची पुस्तके जाळण्याचं धाडस भाजप व त्यांची मातृसंस्था करेल का ? केतकी चितळे जेव्हा संत तुकाराम महाराजांचा अपमान करते तेव्हा हिंदू धर्म धोक्यात नव्हता काय? अगदी देवदेवतांबद्दल हीच केतकी चितळे दारु पित होते, असे लाजिरवाने वक्तव्य करते. पण यावर कुणीच बोलत नाही. कदाचित भाजपाची तिला मुकसंमत्ती असावी. पण जेव्हा लोकशाही सर्वोच्च मंदिरात ऑन द रेकॉर्ड संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा पाढा वाचतात. लोकशाहीच्या मंदिरात अजित पवार संभाजी महाराजांना धर्माच्या चौकटीत अडकवु नका ते धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असा सन्मानाने ऊल्लेख करतात तेव्हा कोश्यारी पुढे लोंटागण घेतलेल्या भाजपाने सभागृहात व राज्यात गोंधळाचा प्रयत्न केला.

“म्हणुन अजित पवार टार्गेट असतात…”
खरं पाहिले तर अजित पवारांना भाजपने व त्यांच्या लावारिस भक्तांनी टार्गेट का केले याचा इतिहास आहे. दादोजी कोंडदेव छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू आहेत की नाही यावर राज्यात गोंधळ निर्माण झाला. डॉ. जयसिंगराव पवार, मा. म. देशमुख, पत्रकार संपादक न्यानेश महाराव, डॉ. आ. ह. साळुंखे या जेष्ठ इतिहासकारांनी इतिहासाचे पुरावे देत स्पष्ट केले की, दादोजी कोंडदेव हे गुरू नाहीत. त्यानंतर अजित पवार हे सत्तेत होते. त्यांच्या सरकारने पुण्यातील लाल महालात दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढला. याचा सनातन प्रतिगामी संघटना व भाजपाच्या मनात राग होता. ती आग भाजपाच्या मनात अद्याप धगधगत आहे. तसेच मागील दिड दोन वर्षापुर्वी अजित पवारांनी अर्थसंकल्पात छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाच्या सुशोभीकरणाला म्हणजेच वढू तुळापुरला तब्बल 250 कोटी रुपये निधीची तरतुद केली. विकास आराखड्याला मंजुरी दिली. याच जागेवरुन अनेकांनी दंगली पेटवण्याचे कारस्थान रचली होती. त्या जाग्यावर आत्ता आपले काही चालणार नाही, हे ज्यांच्या लक्षात आले अशा एकबोटे पण नितांत खोटे बोलण्याऱ्यांना वढु तुळापुर मधील संभाजीराजेंच्या समाधी स्थळाचा विकास पाहावत नव्हता. वढु तुळापूरमधुन आपले वर्चस्व कमी होईल ही शंका एकबोेटेंच्या मनात होती. मग काय वरुन आदेश आला की करा अजित पवारांना टार्गेट…

ज्या संभाजी महाराजांनी सनातनी ब्राम्हणी धर्माला झिडकारले अन महाराष्ट्रधर्म वाढवला होता. त्या संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा जिर्णोधार होत आहे, हे आत्ताच्या सनातन रक्षकांना कसे पचनी पडणार होते. तोही अजित पवारांवर राग होताच. पण त्यापेक्षाही अधिक म्हणजे जनतेने निवडुन दिलेले प्रतिनिधी ज्या सभागृहात काम करतात असे लोकशाहीचे सर्वोच्च मंदिरात अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांना धर्माच्या चौकटीत अडकवु नका म्हणणे अन स्वराज्यरक्षक म्हणणे हे पचले नाही. संभाजी महाराजांचा सभागृहात केलेला सन्मान हा रेकॉर्डवर राहणार होता. ते रेकॉर्डवर राहु नये म्हणुन भाजपाने नाचायला सुरवात केली. पण माघार घेतील ते पवार कसले.

…अजित जे बोलले ते सन्मानपुर्वकच आहे, असाही सुर इतिहासकार व पुरोगामी संघटनांनी काढला. संभाजी ब्रिगेडने थेट समर्थनार्थ भुमिका घेतली. लाल महालापासुन ते वढु तूळापुरच्या 250 कोटी रुपयांच्या विकासातुन व्हाया नागपुर अधिवेशनात अजित पवार टार्गेट होण्याचा इतिहास आहे. शेवटी सांगायचो विसरुनच गेलो की पहाटेचा शपथविधी करुन 72 तासात अंघोळ करुन कपडे स्वच्छ धुवुन घेतेलेलं प्रकरण सुध्दा भाजपवाले आजही विसरलेले नाहीत. म्हणुन देखील अजित पवार नेहमीच भाजपाच्या निशाण्यावर राहतात. पण निशाण्यावर जखमी होतील ते अजित पवार कसले… द्या बत्ती तोफांना… – हर्षल बागल राज्य प्रवक्ते, संभाजी ब्रिगेड संघटना

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button