वेदात्री परिवारात गुंतवणूक करणाऱ्यांची इडीमार्फत चौकशी करावी.
नातेपुते येथील वेदात्री परिवारात कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांचा पैसा आला कुठून?, चौकशी करणे गरजेचे असल्याचे सर्वसामान्य जनतेतून चर्चा सुरू आहे.
वेदात्री परिवारात कोण होणार मालामाल, मालक एजंट गुंतवणूकदार का ? अन्य कोणी?, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
माळशिरस ( बारामती झटका )
संपूर्ण महाराष्ट्रासह अन्य राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या वेदात्री परिवारात गुंतवणूक केल्यानंतर फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल झाल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. वेदात्री परिवारातील कोण होणार मालामाल, मालक एजंट गुंतवणूकदार का अन्य कोणी, याकडे लक्ष लागून राहिलेले आहे. कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींकडे पैसा आला कुठून, याची चौकशी करणे गरजेचे असल्याचे सर्वसामान्य जनतेतून चर्चा सुरू आहे. वेदात्री परिवारात गुंतवणूक करणाऱ्यांची इडीमार्फत चौकशी करावी, या मागणीने जोर धरलेला आहे.

नुकताच २८ महिन्यांपूर्वी वेदात्री परीवाराचा प्रवास सुरु झाला होता. यामध्ये सुरवातीला लगेच काही महिन्यातच पैसे दुप्पट होत होते. त्यानंतर जसा ठेवीदारांचा ओघ वाढला तसा ११ महिन्यानंतर दिडपट रकमेचा परतावा दिला जात होता. दर महिन्याला थोडे मुद्दल व व्याज असा परतावा हप्त्याच्या स्वरूपात दिला जात होता. बॅंकेपेक्षा वेदात्री परिवारात पैसे जास्त मिळत असल्याने मजूर कर्मचारी, शिक्षक , पोलिस, अधिकारी, व्यापारी, पुढारी यांसह अनेकांनी लाखो रुपये वेदात्री परिवारात गुंतविले. एजंटच्या माध्यमातुन कोट्यावधी रूपयांच्या ठेवी जमा झाल्या. या ठेवी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करुन पैसे कंपनी कमवत असल्याचे सांगितले जात होते. लोकांचे गुंतविलेले पैसे हप्ता रुपाने परतही मिळत होते. परंतु नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यापासून परतावा येण्याचे हप्ते बंद झाले. यामुळे एजंटमार्फत फक्त तिन महिने व्याज व त्यानंतर व्याज व मुद्दल मिळुन हप्ता असा परतावा मिळेल असे सांगितले. परंतु, व्याजासह मुद्दल हप्ते मिळाले नाहीत. त्यामुळे गुंतवणुकदारात अस्वस्थता पसरली. वेदात्रीचे संतोष गुरव यांनी ऑडिओ क्लिपद्वारे व्यथा मांडत सर्वांचे पैसे तिन महिन्यानंतर मिळतील, सहकार्य करण्याचे आवाहनही सोशल मिडियाद्वारे केले. यानंतर दुसरी क्लिप पाठवून वेळ दिला, तर मी तिन महिन्यानंतर आपले हप्ते सुरु करु शकतो. आपला एकही रूपया बुडणार नाही याची काळजी घेऊ शकतो, असा विश्वास दिला. मात्र, प्रकरण जास्त चिघळवत गेले तर मी आपणास न्याय देऊ शकणार नाही. तिन महिने सहकार्य करा अशी आर्त विनवणी केली होती. परंतु मुद्दलही नाही व व्याजही मिळत नसल्यामुळे गुंतवणूकदार अधिकच अस्वस्थ झाले आहेत.

माळशिरस तालुक्यातील पहिली तक्रारदार शुभांगीदेवी महेशकुमार देशमुख रा. कुसमोड (पिलिव) यांनी नातेपुते पोलिस स्टेशनला संतोष दत्तु गुरव रा. कोथळे, विजय वसंत क्षिरसागर रा. कोथळे ता. माळशिरस, सचिन गेनु फुले रा. मोरोची ता. माळशिरस यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याचा अधिक तपास उपविभागिय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे हे करीत आहेत. वेदात्री परिवारातील आरोपींना अटक केलेली आहे. सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत. गुंतवणूकदारांची माहिती संकलित झालेली आहे.
धक्कादायक प्रकार आहे. सुरुवातीला थोडी रक्कम वाटत होती मात्र, किल्लारी व सास्तुर येथे भूकंप झाल्यानंतर प्राथमिक माहिती 500 लोक मृत पावले असा आकडा होता. भूकंपामधील कितीतरी हजारो लोक मृत्युमुखी पडलेले होते तसाच हा गुंतवणुकीचा भूकंप आहे. गुंतवणूकदार बसलेले असल्याने कोणाला काही समजू नये, तोंडावर बोट हाताची घडी आहे. मात्र, पोलीस तपासामध्ये गुंतवणूकदार यांची माहिती समोर येत आहे. अशातच एकाने आत्महत्या केलेली असल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागणार आहे. गुंतवणूकदार यांनी गुंतवलेले पैसे आणले कुठून याचाही खुलासा होणे गरजेचे असल्याचे सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. हे वेदात्री प्रकरण कोणत्या वळणावर जाऊन ठेपणार आहे याची गुंतवणूकदारांचे नातेवाईक व सर्वसामान्य जनतेची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांचेकडून संपूर्ण माहिती घेऊन वाचकांच्या समोर वास्तव मांडले जाणार आहे.
तेलही गेले तुपही गेले
गुंतवणुकदारांनी आपली प्रॅापर्टी विकून, कर्ज काढून, दुसऱ्यांकडून कमी व्याजाने पैसे घेऊन, महिलांनी बचत गटातून कर्ज घेऊन वेदात्री परिवारात जास्त पैशाच्या लोभापायी पैसे गुंतविले होते. गुंतविलेले पैसे आता परत मिळू शकणार नाही, या भीतीने गुंतवणूकदारात अस्वस्थता असुन भीतीचे वातावरण पसरले आहे. पैसे परत मिळाले नाहीत तर जास्त मिळकतीच्या लोभापायी मात्र ‘तेलही गेले तुपही गेले, हाती धोपटणे आले’ अशी अवस्था गुंतवणुकदारांची होईल अशी, चर्चा ऐकायला मिळत आहे.
तर एजंटावर कारवाईची गरज
एजंट मार्फतच कोट्यावधी रुपये लोक गुंतवित असतात. एजंट खात्री देत असल्याने अमिषाला बळी पडुनच सर्वसामान्य लोक विविध कंपनित पैसे गुंतवितात. एजंट कोट्यावधी रुपयांची स्थावरमालमत्ता यातुन कमवितात. मात्र कंपनीचा घोटाळा झाल्यास हे कारवाईविना बाजूला रहातात.
काही शिक्षक, नोकरदार अशा विविध स्किमच्या माध्यमातून लोकांना पैसे गुंतविण्यास भाग पाडतात. कंपन्या आल्या की काही शासकीय, निमशासकीय कर्मचारी आपणास मिळत असलेल्या लाभापायी ओळखीचा फायदा करत सर्वसामान्यांना यात ओढत असतात. लोकही नोकरदार एजंटवर विश्वास ठेवुन फसतात. असे एजंट एक कंपनी बंद पडली की बाजारात आलेल्या दुसऱ्या कंपनीशी जोडले जातात. अशा एजंट असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यावर फसवणुकीची कारवाई करुन निलंबन तसेच इतर एजंटावर फसवणुकीची कारवाई करावी, अशी सर्वसामान्य गुंतवणुक दारातून मागणी केली जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng