Uncategorizedताज्या बातम्याशैक्षणिक

मंडलिकवस्ती प्राथमिक शाळा गुणवत्तेत नंबर वन – शर्मिलावहिनी पवार

शाळकरी विद्यार्थ्यांना उबदार ब्लॅंकेटचे मोफत वाटप

इंदापूर (बारामती झटका)

इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्हा परिषदेची मंडलिक वस्ती येथील प्राथमिक शाळेत, शिक्षक पालक व विद्यार्थी यांच्या आदर्श एकोप्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण निर्माण झाले असून पुणे जिल्ह्यात ही प्राथमिक शाळा आदर्श ठरली आहे. या शाळेच्या आगामी प्रगतीसाठी शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून भरीव सहकार्य करण्यात येईल. गुणवत्तेत नंबर वन वर ही प्राथमिक शाळा गेली आहे, अशी माहिती शरयु फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिलावहिनी पवार यांनी दिली

समाजभूषण स्व. अनंतराव पवार (तात्यासाहेब) यांच्या स्मृती दिनानिमित्त शुक्रवार दि. १३ जानेवारी शरयु फौंडेशनच्या वतीने आदर्श जिल्हा परिषद शाळा मंडलिकवस्ती तावशी, (ता. इंदापूर) येथे शरयु फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिलावहिनी पवार यांच्या हस्ते शाळकरी विद्यार्थ्यांना उबदार ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नीलकंठ मोहिते, अनिल काटे, बारामती झटका न्यूज चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील, अभय काटे, सुमित यादव, वसंतराव जगताप, हसन तांबोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. येथील शेकडो विद्यार्थ्यांसोबत गप्पागोष्टी, परिपाठातील धडे, यावर शर्मिलावहिनी पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कला साहित्य प्रदर्शन व निर्मल व स्वच्छ सुंदरग्राम प्रतिकृती या प्रदर्शनास भेट दिली. मुलांनी तयार केलेले साहित्य पाहून मान्यवर भारावून गेले.

पुढे बोलताना शर्मिलावहिनी पवार म्हणाल्या की, राज्यभर शिक्षणाचे जाळे अनेक संस्थेच्या माध्यमातून पसरले आहे. मात्र जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अध्ययनाचे धडे शहरी भागाच्या बरोबरीने मंडलिक वस्ती सारख्या शाळेचे आहेत. त्यामुळे येतील विद्यार्थी सर्व क्षेत्रात चमकत आहेत याचा अभिमान वाटतो. प्राथमिक शाळा असताना देखील, येथील पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे पुढचे भविष्य घडवण्याच्या दृष्टिकोनातून, शाळेला मदत करून अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. यामुळेच शिक्षकांना अध्ययन पद्धती अद्यावत राबवता येते आहे. येथील उर्वरित असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी शरयु फाउंडेशन कटिबद्ध राहणार आहे, अशीही माहिती शर्मिलावहिनी पवार यांनी दिली.

शाळेत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा, महोत्सव, इंग्रजांच्या अध्ययन समृद्धी उपक्रम, शनिवारी दप्तर मुक्त शाळा, इंग्लिश  स्पीकिंग, अबॅकस शिक्षण अशा प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक शर्मिलावहिनी पवार यांनी केले. 

कुरवली केंद्राचे केंद्रप्रमुख मारुती सुपुते साहेब, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वर्षा मोरे, शिक्षणप्रेमी अंकुश मोरे, उपाध्यक्ष रणजीत सपकळ, निलेश राऊत, परवीन महात, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. माधवी प्रवीण शेटे तसेच शिक्षकवृंद अश्विनी दिनेश साळुंखे, चंद्रकांत सोपान बनकर, श्रीमती उज्वला जगन्नाथ भंडलकर, ऋतुजा राहुल सपकळ, सुप्रिया अमरसिंह सपकळ आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button