Uncategorizedताज्या बातम्या
मुस्लिम समाजाची दफन भूमीची वॉल कंपाऊंड पाडल्यामुळे अज्ञात इसमांवर माळशिरस पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस शहरामधील अकलूज- माळशिरस रोड लगत मुस्लिम समजाची पवित्र दफनभूमी आहे. सदरील दफन भूमीच्या चारी बाजूने दगडाचे व विटाचे वॉल कंपाउंड आहे. आणि अकलूज रोडच्या पूर्व बाजूची 35 फूट लांबीची आणि 2 फूट उंचीची भिंत अज्ञात व्यक्तींनी काल रात्री पाडून मुस्लीम समाजाचे 2 ते 3 लाखाचे नुकसान केले आहे.
त्यामुळे माळशिरसमधील मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, अशी तक्रार मलिक करीम इनामदार यांनी माळशिरस पोलिस ठाणे येथे दिली आहे.
सदरील गुन्ह्याचा अधीक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनटक्के हे करीत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng