कचरेवाडी ग्रामपंचायतीच्या सत्तांतरानंतर धुमधडाक्यात विकासकामांना सुरुवात…
थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच सौ. उज्वलाताई सरगर यांनी निवडणुकीतील वचननाम्यातील मतदारांना दिलेल्या शब्दाच्या कार्याची सुरुवात झाली.
कचरेवाडी ( बारामती झटका)
कचरेवाडी ता. माळशिरस या ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील सरपंच व ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतील सरपंच पदाच्या उमेदवार उज्वलाताई हनुमंतराव सरगर यांनी प्रचाराच्या वेळी निवडणुकीत वचननामा तयार केलेला होता. मतदारांनी सेवा करण्याची संधी दिल्यानंतर गावच्या विकासाबरोबर लहान मुलांच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करणार असल्याचे बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी प्रचारादरम्यान घेतलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलेले होते. त्याचप्रमाणे पदभार घेतल्यानंतर उपसरपंचाची निवडणूक पार पडल्यानंतर गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला अंगणवाडीचा प्रश्न सोडवलेला आहे. त्या परिसरातील अनेक लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटणार आहे. कचरेवाडी हद्दीतील केंद्र सरगरवस्ती 61 फाटा या ठिकाणी अंगणवाडी सुरू केलेली आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक माळशिरस नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष
डॉ. मारुतीराव पाटील, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादन सहकारी संस्थेचे व्हाईस चेअरमन व भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव सरगर, थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच सौ. उज्वलाताई सरगर, उपसरपंच ज्ञानदेव मालोजी कोळेकर, कचरे मॅडम, युवा नेते काका पाटील, राजेंद्र सरगर, पोपट सरगर, तुकाराम सरगर, सदाशिव सरगर, बिरदेव कोळेकर, प्रशांत सरगर, साधू कोळेकर, हनुमंत कचरे, शिवाजी सरगर, भागोजी सरगर, राजेंद्र कोळेकर, दीपक कोळेकर, पंढरीनाथ सरगर, नाना कोळेकर, शिवाजी लाडे, सर्जेराव कोळेकर, बाळासाहेब कचरे, शिवाजी सरगर, लक्ष्मण सरगर, मालोजी कोळेकर, बाळासाहेब कोळेकर आदी मान्यवरांसह परिसरातील लहान मुले, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जानेवारी महिन्यात असते. विशेष म्हणजे याच महिन्यात थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच सौ. उज्वलाताई हनुमंतराव सरगर यांच्याकडे पदभार आलेला आहे. राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लहान मुलांच्या अनेक दिवसाचा प्रलंबित प्रश्नापासून कामकाजाला धुमधडाक्यात सुरुवात केलेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng