फोंडशिरस शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पै. सुनील पाटील तर उपाध्यक्षपदी सौ. अनिता रणदिवे यांचे निवड
फोंडशिरस ( बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शाळा व्यवस्थापन समिती निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी पै. सुनिल भालचंद्र पाटील तर उपाध्यक्ष पदी सौ. अनिता बाळू रणदिवे यांची निवड करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्यांमधून श्रीमती सिंधू पोपट वाघमोडे, यांची तर शिक्षणतज्ञ जयपाल भागवत ठोंबरे यांची निवड करण्यात आली.
तसेच सदस्य पदी राहुल शंकर खिलारे, संतोष सिताराम गोरे, नितीन बापू कदम, सुनिल लक्ष्मण जाधव, कैलास अर्जुन पारसे, सुनिल महादेव गोरे, वंदना भिवा वाघमोडे, राजश्री संजय पवार, पूजा सागर ढोबळे, स्वाती शिवाजी राऊत, शशिकला राजू वसव, निलोफर अस्लम मुलाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
त्याचबरोबर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून हर्षाली सचिन बोराटे व राजकुमार तानाजी वाघमोडे यांची तसेच शिक्षक प्रतिनिधी पदी श्रीकृष्ण ढोपे यांची तर सचिव पदी केंद्रिय मुख्याध्यापक कांतीलाल पोतलकर यांची निवड करण्यात आली.
सदरची निवड प्रक्रिया शिक्षण विस्तार अधिकारी प्रदिप करडे साहेब, बी.आर.सी. चे विषयतज्ञ सतिश शिंदे साहेब व विनोद चंदनशिवे साहेब, पोलीस माने साहेब यांनी गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली.
सदर निवड प्रक्रियेसाठी केंद्रप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक कांतीलाल पोतलकर सर, शिक्षक प्रतिनिधी श्रीकृष्ण ढोपे सर, सुधीर गोरे सर, विकास भापकर सर, सुगंधा गेंगजे मॅडम, प्रतिक्षा माने मॅडम, रुपाली कारंडे मॅडम, संगिता शेतसंदी मॅडम यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी युवा नेते भाऊसाहेब (अजिंक्य) पाटील, युवा नेते सलीम मुलाणी, माळशिरस तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक पत्रकार प्रशांत खरात तसेच बहुसंख्य पालकवर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर बैठकीत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दि. 26 जानेवारीला सकाळी 9 ते 12 या वेळात बहारदार विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्याचे सर्वानुमते ठरले. तसेच यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाची सांगता चहापाणानंतर झाली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng