ॲड. प्रभाकर एकनाथ कुलकर्णी ऊर्फ पी. ई. दादा यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा संपन्न होणार.
विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह माजी मंत्री व आजी-माजी आमदार यांच्या उपस्थितीत होणार संपन्न…
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस नगरीचे ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड. प्रभाकर एकनाथ कुलकर्णी तथा ॲड. पी. ई. दादा कुलकर्णी यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा रविवार दि. २१/१/२०२३ रोजी सकाळी १० वा. अक्षता मंगल कार्यालय, अकलूज-माळशिरस रोड, ६१ फाटा, माळशिरस येथे विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी सहकार व पणन मंत्री हर्षवर्धन पाटील, सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तात्रयमामा भरणे, विधान परिषदेचे माजी आ. प्रशांतराव परिचारक, विधान परिषदेचे आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे आ. राम सातपुते, माजी आमदार रामहरी रुपनवर, विशेष सरकारी वकील ॲड. श्री. उज्वल निकम, अध्यक्ष बार असोसिएशन महाराष्ट्र व गोवा ॲड. श्री. मिलिंद थोबडे, माजी अध्यक्ष बार असोसिएशन महाराष्ट्र गोवा ॲड. श्री. हर्षद निंबाळकर या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तरी सर्व मित्र परिवार नातेवाईक यांनी सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा व स्नेहभोजणास उपस्थित राहावे असे आवाहन सौ. हेमलता प्रभाकर कुलकर्णी, श्री. रविंद्र प्रभाकर कुलकर्णी व माळशिरस बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. श्री. बी. आर. पाटील यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng