माढा येथे होणाऱ्या नेत्र शस्त्रक्रिया शिबिरासाठी सुनेत्रा अजित पवार यांना आमंत्रण
९ फेब्रुवारी रोजी शिबिराच्या उद्घाटनाला येण्याची विनंती केली मान्य
माढा (बारामती झटका)
माढेश्वरी अर्बन बँक व विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ निमगाव (टें.) यांच्या संयुक्त विद्यमाने माढा येथे दि. ९ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे आमंत्रण विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या सुविद्य पत्नी तथा बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क च्या संस्थापक-अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार यांना दिले असून त्यांनी शिबिराच्या उद्घाटनाला येण्याची विनंती मान्य केल्याचे माढेश्वरी अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन अशोक लुणावत यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माढा येथे मागील १४ वर्षांपासून नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन केले जाते. तसेच बारामती येथेही एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्यावतीने मागील १० वर्षांपासून नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येते. ही बाब निश्चितच समाजोपयोगी आणि कौतुकास्पद असल्याचे सांगून पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी दोन्ही ठिकाणी शिबिराच्या वेळी केले जात असलेले अचूक नियोजन व व्यवस्थेचे कौतुक केले.
यावेळी टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार यांनी सांगितले की, आमचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यात आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी असे विधायक व रचनात्मक उपक्रम सुरू आहेत, त्याठिकाणी जाऊन त्यांचे कौतुक करुन त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे हे पवार कुटुंबीयांचे कर्तव्य समजतो. माढा येथे आमदार बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या नेत्र शिबिराच्या बाबतीत मी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांच्याकडून ऐकले आहे. परंतु यावेळेस माढा येथे प्रत्यक्ष शिबिराच्या ठिकाणी जाण्याचा योग येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माढेश्वरी बँकेचे उपाध्यक्ष अशोक लुणावत यांनी बारामती येथे आयोजित नेत्र शिबिराच्या ठिकाणचे सुसज्ज व अद्ययावत ऑपरेशन थिएटर, रुग्णांचा वार्ड, निवासाची व भोजनाची व्यवस्था, एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या सदस्यांच्या ड्रेस कोड व शिस्त याची पाहणी करून कौतुक केले. पवार कुटुंबीयांचे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक, शैक्षणिक, सहकार, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी आदी क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
यावेळी जागतिक कीर्तीचे नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, हितेश छाजेड, अमोल कुटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This article had me laughing and learning! For those interested, check out: DISCOVER HERE. What’s your take?
Muchas gracias. ?Como puedo iniciar sesion?