Uncategorizedताज्या बातम्याराजकारण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ तालुक्याच्यावतीने एक दिवसीय कार्यकर्ता शिबिर संपन्न
मावळ (बारामती झटका)
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ तालुक्याच्या वतीने एक दिवसीय कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पक्ष संघटन, सोशल मीडिया, बूथ स्तरावर पक्ष बांधणी अशा अनेक विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच कार्यकर्त्याची भूमिका यावर सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनिलअण्णा शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांच्यासह तालुक्यातील जेष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या शिबिराला कार्यकर्त्यांसह जनतेचा देखील अतिशय उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng