जलनायक शिवराज पुकळे यांचे अनावश्यक खर्चाला फाटा देत गरजू विद्यार्थ्यांना मदत करून शुभेच्छा देण्याचे आवाहन
पिलीव (बारामती झटका)
जलनायक शिवराज पुकळे यांचा वाढदिवस दि. २६ जानेवारी रोजी असतो. यावर्षी अनावश्यक खर्चाला फाटा देत विधायक कार्य करून साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दि. २४ जानेवारी २०२३ रोजी शिवराज पुकळे युवाशक्तीच्या माध्यमातून महारत्न सांस्कृतिक, क्रीडा व बहुउद्देशीय संस्था झिंजेवस्ती व त्रिवेणी ज्ञानपीठ पुणे यांच्या द्वारा मोफत आरोग्य शिबिर व शासकीय योजना शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये लोकांना माहिती देऊन त्यांना फायदा होईल असे कार्य केले तरी शुभेच्छा दिल्यासारखे होईल.
यावर्षी शिवराज पुकळे यांनी आवाहन केले आहे की, हार, फेटे, केक इत्यादी गोष्टी न आणता शालेय वस्तू त्यामध्ये वही, पेन, स्कूल बॅग, इतर शालेय साहित्य अशा गोष्टी आणून गरजू विद्यार्थ्यांना या वस्तू देऊन वाढदिवस साजरा करावा. त्याचबरोबर दि. २६ जानेवारी रोजी बाहेरगावी जाणार असल्यामुळे दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते पिलीव येथील शिवराज पुकळे संपर्क कार्यालय, पडळकर कॉम्प्लेक्स येथे उपस्थित असणार आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng