वेळापूर येथील बनकरमळा जि. प. शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
वेळापूर (बारामती झटका)
सोमवार दि. २३.१.२०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बनकर मळा व अंगणवाडी वेळापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन 2023 न्यू इंग्लिश स्कूल वेळापूर चे मुख्याध्यापक आर. बी. पवार यांच्या अध्यक्षतेखाली व सामाजिक कार्यकर्ते गोपाळ आबा क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन आणि रंगमंचाचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेतील बालचमुंनी विविध कलागुण सादर केले. यामध्ये शेतकरी नृत्य, लावणी नृत्य, देशभक्तीपर गीते, भक्ती गीते, विनोदी नाट्य असे विविध कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी वेळापूर केंद्राचे केंद्रप्रमुख घाडगे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साधू पिसे, किसन बनकर, महादेव बनकर, मारुती बनकर, विठ्ठल पिसे, पोपट शेंडगे, मालोजी बनकर, शिवाजी आडत, विठ्ठल वाघे, शकील शेख, पालक, सर्व ग्रामस्थ व अंगणवाडी सेविका राणी बनकर, जयश्री अडसूळ तसेच विविध माध्यमांचे पत्रकार महादेव जाधव, किरण जाधव, अशोक पवार, शिवाजी मंडले, गणेश जामदार यांनी उपस्थिती लावली.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक मुख्याध्यापक उत्तम कटके यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng