अकलूज येथील श्रीमती सुजाता शेटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
वाघोली (बारामती झटका)
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित श्री सावतामाळी विद्यालय माळेवाडी, अकलूज येथील मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता शेटे यांना दि. २२ जानेवारी २०२३ रोजी सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार श्री दत्त प्रशाला मोहोळ येथे प्रदान करण्यात आला. सदरचा पुरस्कार विज्ञान संघाचे राज्य संचालक लक्ष्मीप्रसाद मोहिते, जिल्हाध्यक्ष शिवाजी चापले, कार्याध्यक्ष सुनील लिगाडे, श्री. अमोल फुले, जिल्हा कार्यकारणी सदस्य व विज्ञान मंडळाचे तालुकाध्यक्ष साठे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कार वितरणावेळी वाघ मॅडम, पवार मॅडम, जाधव मॅडम तसेच जिल्हा कार्यकारणी चे सर्व सदस्य उपस्थित होते. श्रीमती सुजाता शेटे या 1994 पासून विज्ञान मंडळच्या सक्रिय सदस्या असून शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित श्री सावतामाळी विद्यालय माळेवाडी, अकलूज येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत असून सन २००० मध्ये शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विज्ञान यात्रा भरविण्यात आली होती. त्या यात्रेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. डिसेंबर २०१३ रोजी विज्ञान मंडळाचे जिल्हा अधिवेशन अकलूजमध्ये घेऊन यशस्वीरित्या पार पाडले होते.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक व सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष श्री संग्रामसिंह मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव खराडे, श्री. जालिंदरभाऊ फुले, माजी सरपंच माळेवाडी श्री नामदेवराव गलांडे साहेब, सभापती सावतामाळी विद्यालय अकलूज माळेवाडी व सर्व सदस्य तसेच विद्यालयातील शिक्षक बांधवांनी सदरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमती सुजाता शेटे यांचे अभिनंदन केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng