मेडद गावची प्रतीक्षा लवटे हिने पुणे विभागीय मंडळात इंग्रजी विषयात ९९ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
माळशिरस तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात प्रतीक्षा पोपट लवटे पाटील यांच्या कन्येने मानाचा तुरा रोवला
माळशिरस ( बारामती झटका )
श्री भैरवनाथ विद्यालय, मेडद या शाळेतील मेडद गावची सुकन्या कु. प्रतीक्षा पोपटराव लवटे पाटील या विद्यार्थिनीने एसएससी मार्च २०२२ परीक्षेत इंग्रजी विषयात विभागीय मंडळ पुणे यामध्ये मुलीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. १०० पैकी ९९ गुण मिळाल्याचे विभागीय मंडळाकडून पत्र प्राप्त झाले आहे. कुमारी प्रतीक्षा लवटे पाटील हिचे अभिनंदन श्री भैरवनाथ विद्यालयाचे अध्यक्ष बाळासाहेब लवटे पाटील, मुख्याध्यापक सूर्यकांत तेरखेडकर व इंग्रजी विषयाचे शिक्षक प्रदीपकुमार ननवरे, सर्व शिक्षक वृंद आणि समस्त मेडद ग्रामस्थ यांच्यामधून अभिनंदन केले जात आहे. पुणे विभागामध्ये शिक्षण क्षेत्रात मेडद गावची कन्या प्रतीक्षा पोपटराव लवटे हिने मानाचा तुरा रोवलेला असल्याने माळशिरस पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी श्री. धनंजय देशमुख व सर्व शिक्षण क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्री भैरवनाथ विद्यालय, मेडद या संस्थेचे अध्यक्ष व माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील यांची प्रतीक्षा ही नात आहे. मेडद गावचे माजी सरपंच नाथाआबा लवटे पाटील यांची पुतणी आहे तर, सौ. शोभाताई व श्री. पोपटराव लवटे पाटील यांची कन्या आहे.
लवटे पाटील घराण्याने आजपर्यंत राजकारण व कुस्ती क्षेत्रांमध्ये नावलौकिक केलेला आहे. शिक्षण क्षेत्रात कुमारी प्रतीक्षा लवटे पाटील हिच्या रूपाने शिक्षण क्षेत्रात सुद्धा दमदार कामगिरी केलेली आहे.

श्री. पोपटराव लवटे पाटील हे उत्कृष्ट पैलवान होते. त्यांचा पळसमंडळ येथील करे घराण्यातील शोभाताई यांच्याशी विवाह झालेला आहे. त्यांना प्रतीक्षा व प्रसाद अशी दोन मुले आहेत. प्रसाद नववीत शिकत असून सध्या तालमीत सराव करीत आहे. तर प्रतीक्षा नेट परीक्षेसाठी लातूर येथे शिक्षण घेत आहे. कु. प्रतीक्षा हिच्या रूपाने लवटे पाटील घराण्याची शिक्षण क्षेत्रात नवीन वाटचाल सुरू असून मेडद गावच्या व माळशिरस तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवलेला असल्याने बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांचेकडून कु. प्रतीक्षा हिच्या पुढील शैक्षणिक कार्यकालासाठी हार्दिक शुभेच्छा आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
