चांदापुरी येथील जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
चांदापुरी (बारामती झटका)
चांदापुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. चांदापुरीचे नुतन सरपंच जयवंत आण्णा सुळ, उपसरपंच तात्यासो चोरमले, युवा नेते विजयसिंह पाटील आदींसह अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते फीत कापुन माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पुजन करुन दीपप्रज्वलन आणि रंगमंचाचे पुजन करण्यात आले.
यावेळी शाळेतील बालचमुंनी विविध कलागुण यामध्ये शेतकरी नृत्य, लावणी नृत्य, देशभक्तीपर गीते, भक्ती गीते, विनोदी नाटक असे विविध कलाविष्कार सादर करुन प्रेक्षकांची वाहवा मिळवली. यावेळी केंद्रप्रमुख राजु गोरवे, सत्यजित बनकर सर, बापुसाहेब चंदनशिवे सर, नुतन ग्रामपंचायत सदस्या सौ. सविता पाटील, सौ. प्रियंका सरक, सौ. दिपाली निकम, नुतन सदस्य अजित लोखंडे, आप्पा शिंदे, हनुमंत सरतापे, माजी सरपंच भजनदास चोरमले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय कोपनर, उपाध्यक्ष संतोष सरक, दिपक कोपनर, युवानेते शाहिद शेख, विकास कोळपे, आप्पा पाटील, शिवाजी पाटील, अनिल मगर, शिवाजी गोरवे, बापु लोखंडे, बाबा पुकळे, बाळु पाटोळे, प्रकाश शिंदे, प्रदिप लाडे आदींसह तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील शिक्षकवर्ग, पत्रकार अभि तावरे, दामोदर लोखंडे, संजय पाटील सर, रशिद शेख इ. मान्यवर, ग्रामस्थ, महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजु गोरवे सर यांनी केले तर, आभारप्रदर्शन सत्यजित बनकर सर यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great read! Your breakdown of the topic is commendable. For further reading, here’s a useful resource: READ MORE. Let’s discuss!