Uncategorized

पाणीदार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या भव्य नागरी सत्काराचे बुद्रुककडून आयोजन खुर्दला वगळले…..

माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या भव्य नागरी सत्कार कार्यक्रमात भाजपमध्ये श्रेयवादाचा वाद उफाळला आहे.

नातेपुते ( बारामती झटका )

माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खा. रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी माळशिरस तालुक्यातील अनेक दिवस प्रलंबित असणारे फलटण-पंढरपूर रेल्वे व निरा-देवधर प्रकल्प या दोन्ही कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून मंजूर करून घेतल्याबद्दल माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टी नातेपुते शहर भारतीय जनता पार्टी व निरा-देवधर संघर्ष समिती यांच्यावतीने भव्य नागरी सत्कार कार्यक्रमात भाजपमध्ये श्रेय वादाचा वाद उफाळला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पाणीदार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या भव्य नागरिक सत्काराचे भाजपमधील बुद्रुक नेते व कार्यकर्ते यांच्याकडून आयोजन केलेले आहे. मात्र, भाजपमधील मोहिते पाटील भाजप खुर्द गटाला वगळले आहे, असे एकंदरीत नागरी भव्य सत्काराचे आयोजनावरून चित्र स्पष्ट होत आहे.

भव्य नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा नियोजन समिती सदस्य के. के. पाटील, धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंत सूळ, नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक बी. वाय. राऊत, भाजपा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, नातेपुते नगरपंचायत नगरसेवक दादासाहेब बोराडे, निरा-देवधर संघर्ष समिती भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, भाजपा माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, भाजपा नातेपुते शहर अध्यक्ष देविदास चांगण अशा नावांची सोशल मीडियावर पोस्ट फिरत आहे. त्यासोबत भव्य नागरी सत्काराचा डिजिटल फ्लेक्स आहे. सदरच्या फ्लेक्सवर विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचा फोटो आहे. मात्र, नियोजनामध्ये नेते व कार्यकर्ते यांना वगळलेले आहे. माळशिरस तालुका भाजपचे तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर यांचे नाव नाही नातेपुते नगरीत भव्य नागरी सत्कार होत असताना भाजपच्या विचाराचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष असताना देखील दोन नगरसेवक यांचीच नावे आहेत.

नातेपुते नगरीमध्ये भाजपच्या विचाराचे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे यांच्यासह अनेक खुर्द भाजपमधील नेते व कार्यकर्ते असताना संयोजनाच्या पोस्टमध्ये कोणीही नाही. त्यामुळे माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या भव्य नागरी सत्कार कार्यक्रमात भाजपमध्ये श्रेयवादाचा वाद उफाळणार का, असे एकंदरीत राजकीय चित्र आहे. वास्तविक पाहता सर्व समावेशक भव्य नागरी सत्कार असायला पाहिजे, अशी सर्वसामान्य जनता व शेतकरी यांची भावना आहे. पाणीदार खासदार यांनी सर्वांना लाभ होईल, अशी फलटण-पंढरपूर रेल्वे व निरा-देवधर प्रकल्प या दोन्हीही रखडलेल्या योजनेसाठी ऐतिहासिक निर्णय करून जनतेचे हित पाहिलेले असल्याने भाजपमध्ये असणारा श्रेयवाद न पाहता पाणीदार खासदार यांच्या कार्याकडे पाहून अनेक सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहतील असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

8 Comments

Leave a Reply

Back to top button