पिलीव येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेस पालखी सोहळ्याने सुरुवात
पिलीव (बारामती झटका) रघुनाथ देवकर यांजकडून
पिलीव ता. माळशिरस येथील जागृत देवस्थान श्री महालक्ष्मी देवी हे देवस्थान महाराष्ट्र व कर्नाटक अशा अनेक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असून या देवीची यात्रा माघ पौर्णिमेला सुरुवात होत असते व महाशिवरात्रीला सांगता होते. या यात्रेमध्ये जनावरांच्या बाजारसाठी इतर राज्यातूनही बहु गर्दी होत असते. त्याचप्रमाणे महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातून भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने दरवर्षी देवीच्या दर्शनाला येत असतात. या यात्रेमध्ये जनावरांच्या बाजारामध्ये व इतर व्यापारी, व्यवसायिक, कलावंत या सर्वांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या रूपाने व कामाच्या रूपाने फायदा होत असतो.
या यात्रेमध्ये लहान मुलांच्या खेळण्यांची, शेतकऱ्यांच्या अवजारांची, सौंदर्यप्रसाधनाची त्याचप्रमाणे अल्पोहाराची, भोजनाची व हौसेच्या वस्तूची स्टॉलच्या रूपाने खरेदी विक्री करण्यासाठी दुकाने थाटली जातात. त्याचप्रमाणे जनावरांचे शेतीमालाचे प्रदर्शन मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच करमणुकीसाठी सिनेमा थिएटर सर्कस पाळणे, लोकनाट्य यांचाही समावेश असतो. तसेच महाराष्ट्रीय मुलांच्या जंगी कुस्त्या या ठिकाणी होत असतात. या यात्रेमध्ये सर्व धार्मिक कार्यक्रमाबरोबरच मनोरंजनाचेही कार्यक्रम असतात. त्यामुळे या यात्रेला सर्व ठिकाणाहून भाविक भक्त, उद्योगासाठी गेलेले ग्रामस्थ, सासरी गेलेल्या माहेरवासीन, तसेच बाहेर असलेले नोकर चाकर सर्वजण मोठ्या भक्तीभावाने या यात्रेला उपस्थिती दाखवत असतात. अशा या यात्रेचा प्रारंभ माघ पौर्णिमेला देवीची मुर्ती पालखीमध्ये ठेऊन मेटकरी वाड्यापासून पिलीवच्या मुख्य पेटीतून श्री महालक्ष्मी मंदिरापर्यंत वाजत गाजत “श्री महालक्ष्मीच्या नावाने चांगभलं” अशा गजरामध्ये भक्तीमय वातावरणामध्ये मिरवणुकीच्या रूपातून यात्रेच्या ठिकाणापर्यंत प्रस्थान झाले. सदर यात्रा कार्यक्रमाचा सांगता समारंभ दि. १४/२/२३ ला होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng