एक हजार चष्म्याचे मोफत वाटप उत्कृष्ट सामाजिक उपक्रम – किरणतात्या सावंत
करमाळा (बारामती झटका)
डोळे तपासणी करून चष्मा खरेदी करण्यासाठी किमान एक हजार रुपये खर्च येतो मात्र, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने एक हजार रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत चष्मे देण्यात आले, ही बाब कौतुकास्पद असून अशा सामाजिक उपक्रमामुळे सर्वसामान्य जनतेला मदत होऊ शकते, असे मत भैरवनाथ शुगर विहाळ कार्यकारी संचालक किरणतात्या सावंत यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरात स्त्रियांच्या गर्भाशयातील कॅन्सरची तपासणी करण्यात आली. यावेळी जवळपास 90 महिलांनी याचा लाभ घेतला. याशिवाय लाखो रुपये किमतीची औषधे मोफत देण्यात आली व एक हजार रुग्णांना डोळे तपासून चष्म्याचे वाटप करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन किरणतात्या सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना किरणतात्या सावंत म्हणाले की, सध्याच्या काळात आरोग्यसेवेला फार महत्त्व आले आहे. आरोग्यसेवा केल्यानंतर जे समाधान मिळते ते कुठल्याही सेवेत नाही. इथून पुढील काळातसुद्धा आरोग्य सेवेच्या संदर्भात काही उपक्रम राबवले गेल्यास मी त्यात स्वतः सहभागी होऊन हे कार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, तालुकाप्रमुख देवानंद बागल, युवा सेनेचे समन्वयक निखिल चांदगुडे, तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, शहर प्रमुख विशाल गायकवाड, शहर प्रमुख संजय गुणवंत, वरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, द्वितीय कक्ष प्रमुख रोहित वायबसे, नागेश शेंडगे, वैद्यकीय कक्ष समन्वयक शिवकुमार चिवटे, वस्ताद अजिनाथ कोळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng