करमाळा एमआयडीसीला उजनीतून कायमस्वरूपी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा सर्वे करण्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आदेश
करमाळा (बारामती झटका)
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ करमाळा कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा नसल्यामुळे उद्योजक येत नाहीत. यामुळे तात्काळ उजनी धरणातून करमाळा एमआयडीसीला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेचा सर्वे करा, असे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोलापूर येथील अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.
नियोजन भवन सोलापूर येथे सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसीतील प्रश्नासंदर्भात अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी करमाळ्यातील एमआयडीसी बद्दल अनेक प्रश्न मांडले.
करमाळा एमआयडीसीतील भूखंडाचे दर कमी करावेत, छोटे छोटे भूखंडाची निर्मिती करावी शिवाय या एमआयडीसीमधील पाणी उपलब्ध नसल्यामुळे मोठे उद्योजक येत नाहीत, यामुळे तात्काळ पाण्याचा प्रश्न सोडवावा, असे प्रश्न मांडले. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, एमआयडीसी चे डेप्युटी इंजिनियर मगर साहेब, प्लॅनिंग डायरेक्ट राजेंद्र गावडे, सांगली रिजनच्या कार्यकारी संचालिका श्रीमती बिरजे मॅडम, एमआयडीसीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
त्यावेळी महेश चिवटे यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ या प्रश्नावर मार्ग काढावा व उजनी धरणातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, मी निधी उपलब्ध करून देतो, असंही यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की, करमाळा एमआयडीसीची भूसंपादन होऊन पंचवीस वर्षे उलटून गेली आहेत. अद्याप एकही उद्योग येथे आलेला नाही. कोणी प्लॉट घ्यायला येथे धजवत नाही, अनेकजणांनी प्लॉट घेऊन या ठिकाणी परत दिले आहेत. सध्या या ठिकाणी तात्पुरती उपाययोजना म्हणून एक विहिरीचे काम सुरू आहे.
ही एमआयडीसी सुरू न झाल्यामुळे करमाळ्यात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, यामुळे तात्काळ ही एमआयडीसी सुरू करण्याची गरज आहे. येत्या दोन वर्षात किमान दहा तरी उद्योग या ठिकाणी उभा व्हावेत, यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमुख महेश चिवटे यांनी करमाळा एमआयडीसीला उजनी धरणातून कायमस्वरूपी पाईपलाईन करावी, जेणेकरून उद्योग या ठिकाणी येतील ही मागणी केली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ याचा सर्वे करण्याचे आदेश दिले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
What a fantastic read! The humor made it even better. For further details, check out: READ MORE. Any thoughts?