नातेपुते येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी १२० कोटीची योजना मार्गी लावणार – आ. रणजीतसिंह मोहिते पाटील
शहराच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, सर्व जनतेचा पैसा आहे, कामे दर्जेदार व चांगली करून घ्या – लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते.
नातेपुते ( बारामती झटका )
नातेपुते येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी १२० कोटीची योजना मार्गी लावणार, असे मत विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले. येथील नातेपुते नगरपंचायतीच्या १७ कोटी ५० लाख च्या विविध विकासकामाच्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमूख होते. यावेळी विविध विकासकामांचे भूमीपूजन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमूख्यमंञी विजयसिंह मोहीते पाटील, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, युवा आमदार रणजितसिंह मोहीते पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबाराजे देशमूख यांच्याहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नातेपुते नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मालोजीराजे उर्फ आबासाहेब देशमूख यांनी अंडरग्राऊड लाईट, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ई-लायब्ररी, शादीखाना या प्रस्तावित मागण्या केल्या. यावेळी पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, नगराध्यक्ष उत्कषाराणी पलंगे यांनी विकासकामांच्या विविध मागण्या केल्या.
पुढे बोलताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले कि, कोणाचीही शेतीची विज तोडली जाणार नाही, यासाठी ३ एचपीसाठी ३००० रू., ५ एचपीसाठी ५००० रू., २१ तारखेपर्यत भरावे लागणार आहेत. तसेच नातेपुते बसस्थानक बीवोटी तत्वावर चालविण्यास देण्यासाठी प्रयत्नशील आहे. नगरपंचायत कामगार भरती करणार, तलाठी ऑफीसची मागणी, दोन्ही पालखी मार्गावरील अडचणी प्राध्यान्याने सोडविणार, तसेच अंडरग्राऊसाठी पाणी, ड्रेनेज, लाईट यासाठीचा प्रस्ताव तातडीने द्या, तो मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते म्हणाले की, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत काळजी करू नका. चार महीन्यात १३ कोटी २० लाखाचा निधी मिळाला, निधीची कमतरता भासणार नाही. नातेपुते शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे. अजूनही निधिची कमतरता भासणार नाही. हा सर्व जनतेचा पैसा आहे, कामे चांगली करुन घ्या, येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्यामागे खंबीरपणे मागे रहा, कृष्णा-भिमा स्थिरिकरण योजना मार्गी लावणार, १५ दिवसांत शहरातील पुणे-पंढरपुर रस्ता डांबरीकरण करणार, बसस्थानकावर संपूर्ण डांबरीकरण करणार असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमूख म्हणाले, निरा देवधर प्रकल्पाचे संपुर्ण श्रेय हे विजयदादांचे आहे. विजयदादांमुळे हि योजना मार्गी लागली. नातेपुते नगरपंचायत झाल्यामूळे निधी मोठ्या प्रमाणात येत आहे. गोरगरिब जनतेच्या घरकूल योजनेसाठी गावठाण जागा नाही. त्यासाठी शहराच्या शेजारील गायरान जमीन नगरपंचायतीस मिळाल्यास घरकूल योजना राबविता येईल, हा प्रश्न प्राधान्याने सोडवावा.
या कार्यक्रमास माजी जि. प. उपाध्यक्ष बाबाराजे देशमूख, जेष्ट नेते रघूनाथ कवितके, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, नगराध्यक्ष उत्कषाराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमूख, बांधकाम सभापती अतूल पाटील, मूख्याधीकारी माधव खांडेकर, ॲड. शिवाजीराव पिसाळ, नगरसेवक रणजित पांढरे, अविनाश दोशी, आण्णा पांढरे, सूरेंद्र सोरटे, नंदू लांडगे, अतूल बावकर, बाळासाहेब काळे, रणविर देशमूख, बाहूबली चंकेश्वरा, रणधिर पाटील, महेश शेटे, शक्ति पलंगे, अर्जून जठार, उपस्थित होते. आभार मूख्याधिकारी माधव खांडेकर यांनी मानले तर, सूञसंचालन माधूरी चव्हाण, दिपक जाधव यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng