निरा-देवघरच्या पाण्यासाठी जलनायक शिवराज पुकळे यांच्या संवाद दौऱ्याची सुरूवात
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी भागासाठी निरा-देवघर धरणाचे पाणी मिळण्यासाठी संघर्ष, लढा उभा करणारे जलनायक शिवराज पुकळे ऊर्फ भाऊसाहेब यांनी माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी २२ गावांच्या पाणी प्रश्नांसाठीचा लढा उभा केला. कोथळे, कारुंडे, गिरवी, पिंपरी, लोणंद, कन्हेर, इस्लामपूर, फडतरी, लोंढे-मोहीतेवाडी, भांब, रेडे, मांडकी, जळभावी, गोरडवाडी, मोटेवाडी, तरंगफळ, गारवाड, मगरवाडी, पठाणवस्ती, सुळेवाडी, बचेरी, शिंगोर्णी ही २२ गावे दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यापैकी कारुंडे, गिरवी, पिंपरी, लोणंद, कन्हेर, इस्लामपूर, रेडे, मांडकी, गोरडवाडी, मोटेवाडी या गावांना निरा-देवघर प्रकल्पामधून पाणी मिळण्याच्या कामाला गती मिळून निधी मंजूर झाला आहे. उर्वरित कोथळे, फडतरी, लोंढे-मोहीतेवाडी, भांब, जळभावी, तरंगफळ, गारवाड, मगरवाडी, पठाणवस्ती, सुळेवाडी, बचेरी, शिंगोर्णी या गावांना पाणी मिळण्यासाठी संघर्ष चालूच ठेवण्यासाठी, 12 गावातील लोकांसमवेत विचार विनिमय करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी संवाद दौऱ्याची सुरुवात सुळेवाडी गावातून केली आहे.

यामध्ये निरा-देवघर प्रकल्पाविषयी सखोल माहिती देण्यात आली. तसेच प्रकल्पाविषयी प्रश्नोत्तरे संवाद दौऱ्याच्या माध्यमातून झाली, त्यामुळे लोकांमधून जनजागृती होऊन निरा-देवघरचे पाणी मिळवण्यासाठी जलनायक शिवराज पुकळे यांच्या पाठीशी उभा राहून हाक देईल तिथे साथ देण्याचा निर्धार सुळेवाडीकरांनी केला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng