अकलूज येथे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन
इनाम रुपये ३ लाख ५१ हजार रुपयांसाठी महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील विरुध्द पै. माऊली कोकाटे यांच्यात लढत
अकलूज (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज शहर काँग्रेस कमिटी, माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना माळशिरस तालुका यांच्यावतीने भव्य कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन शुक्रवार दि. ३/३/२०२३ रोजी दुपारी २ वा. धवल श्रीराम मंदिर, अकलूज-इंदापूर रोड, अकलूज, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे.
यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये ३ लाख ५१ हजार रुपयांसाठी महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील, शाहू कुस्ती केंद्र, सोलापूर आणि पै. माऊली कोकाटे, सराटी, हनुमान आखाडा, पुणे यांच्यात लढत होणार आहे. इनाम रुपये १ लाख ५१ हजार रुपयांसाठी पै. वैभव माने, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल, पुणे विरुद्ध पै. शुभम सिद्धनाळे, शिवराम दादा कुस्ती केंद्र, पुणे यांच्यात लढत होणार आहे. इनाम रुपये १ लाख रुपयांसाठी पै. संग्राम साळुंखे, प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा, सदाशिवनगर विरुद्ध पै. शरद पवार, भोसले व्यायाम शाळा, सांगली यांच्यात लढत होणार आहे. इनाम रुपये ५१ हजार रुपयांसाठी कामगार केसरी महाराष्ट्र चॅम्पियन पै. कालीचरण सोलनकर, विश्वास हरगुले यांचा पठ्ठा, गंगावेश तालीम, कोल्हापूर विरुद्ध कामगार केसरी महाराष्ट्र चॅम्पियन पै. आशिष वावरे, शिवराम दादा कुस्ती केंद्र, पुणे यांच्यात लढत होणार आहे. इनाम रुपये ३१ हजार रुपयांसाठी पै. प्रकाश कोळेकर, प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा, सदाशिवनगर विरुद्ध पै. अविनाश दोरकर, हनुमान तालीम, अकलूज यांच्यात लढत होणार आहे.
सदर कुस्ती मैदानाचे समालोचन पै. हनुमंत शेंडगे, पै. युवराज केचे, पै. राजू देवकाते हे करणार आहेत. तरी मल्ल सम्राट, कुस्ती शौकीन आणि पैलवानांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng