मध्यप्रदेश गँगरेप प्रकरणातील आरोपीला वेळापूर पोलिसांनी पकडून मध्यप्रदेश पोलिसांच्या दिले ताब्यात !
वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर परिसरात वेळापूर पोलिसांनी मध्यप्रदेश गॅंगरेप प्रकरणातील आरोपीला पकडून मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिल्याने वेळापूर पोलिसांच्या चांगल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.
याविषयी अधिकवृत्त असे की, मध्यप्रदेशातील कोतवाली पोलीस स्टेशन जिल्हा उमरिया रीवा गाव परिसरात ७ जणांनी केलेल्या गॅंगरेप प्रकरणातील गुन्हा रजिस्टर २३,२१ भा.द.वि. कलम ३६३ ३६६ अ३७६ (३) ३७६ डी ए, ५०६, ३७६(२),w अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली होती. त्यामधील मध्य प्रदेश पोलिसांनी ७ पैकी ६ आरोपिंना अटक केली होती. त्यापैकी दोन वर्षापासून रोहित प्यारेलाल यादव वय २५ रा. रिवा मध्य प्रदेश हा फरार होता. मध्यप्रदेश पोलिसांना सदर आरोपी सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथे असल्याची तांत्रिक माहिती मिळाल्याने कोतवाली पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनिरीक्षक सरिता ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार गुटेर, पोलीस कॉन्स्टेबल रोशन चव्हाण, सदरची पोलीस टीम वेळापूर पोलीस स्टेशन येथे हजर होऊन वरील आरोपीबाबत चर्चा करून सदर आरोपी वेळापूर परिसरात असल्याचे वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव यांना माहिती व ठिकाण कळताच अकलूज उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतचे योग्य ते नियोजन करून वेळापूर पोलीस स्टेशन पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल जनार्दन करे, पोलीस कॉन्स्टेबल विश्वंभर थिटे व मध्य प्रदेश पोलीस पथक यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे वेळापूर मधील त्या परिसरात जाऊन या गुन्ह्यातील आरोपीला काम करत असताना त्याला जागेवरच पकडले व वेळापूर पोलीस स्टेशन येथे आणून वेळापूर पोलिसांनी त्याला मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng