माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेवर समविचारी संघटनांच्या स्वाभिमानी परिवर्तन परिवाराने विजय संपादन करून सत्ता खेचून आणली
वेळापूर (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे लक्ष लागून राहिलेल्या माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेवर समविचारी संघटनांच्या स्वाभिमानी परिवर्तन परिवाराने 12-3 असा विजय संपादन करून सत्ता खेचून आणली. तर दारुण पराभवानंतर प्रस्थापित गुरुसेवा परिवार सत्तेतून पाय उतार झाला. या निकालाने जिल्हा पतसंस्थेच्या निवडणुकीतही माळशिरस तालुक्यातून आघाडी घेतलेल्या स्वाभिमानी परिवाराने तालुका पतसंस्थेवर विजय संपादन करताना प्रस्थापित प्रतिस्पर्धी गुरुसेवा परिवाराच्या विद्यमान संचालक मंडळातील दोन माजी चेअरमन, एक व्हाईस चेअरमन यांच्यासह बारा उमेदवारांना पराभवाचा धक्का देऊन तालुक्यावर वर्चस्व सिद्ध केले.
स्वाभिमानी परिवर्तन पॅनलमध्ये शिक्षक संघ संभाजीराव थोरात गट यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक समिती, जुनी पेन्शन संघटन आदर्श शिक्षक समिती, शिक्षक भारती, एकल शिक्षक मंच, दिव्यांग संघटना, पदवीधर शिक्षक संघटना, स्वाभिमानी जय विजय गट, अल्पसंख्यांक संघटना, कस्ट्राइब संघटना या माळशिरस तालुक्यातील समविचारी संघटना पुढील पाच वर्षाचा संकल्पनामा घेऊन परिवर्तनाची हाक देत मैदानात उतरल्या होत्या. या विजयात दिलीप ताटे, शरद रुपनवर, किरण काळे, अशोक रुपनवर, पोपट भोसले, विठ्ठल सावंत, उमाजी माने, विजयकुमार देशमुख, पोपट पालवे, मिनाज मुलाणी, लक्ष्मीकांत कुलकर्णी, गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा, तालुका, केंद्र स्तरावरील पदाधिकारी, तालुका पतसंस्थेचे माजी संचालक, महिला आघाडी तालुका कार्यकारिणी, स्वाभिमानी परिवाराच्या शिलेदारांनी मोलाचे योगदान दिले.
लक्ष्यवेधी लढती
इतर मागास प्रवर्गातील लक्षवेधी ठरलेल्या लढतीत जाइंट किलर ठरलेल्या पांडुरंग मोहिते यांनी माजी चेअरमन आणि तीन टर्म संचालक राहिलेल्या नितीन बनकर यांच्यावर दणदणीत विजयी मिळविला. तर अनुसुचित जाती जमाती प्रवर्गात मामा-भाचे यांच्या लढतील अनुभवी मामावर नवख्या भाचा भारी ठरला. भाचे आत्माराम गायकवाड यांनी माजी चेअरमन आणि तीन टर्म संचालक असलेले मामा हरी खरात यांच्यावर मात केली.
विजयी उमेदवार: केंद्र, बीट, कंसात मिळालेली मते
सर्वसाधारण:
स्वाभिमानी परिवार: अशोक पवार-वेळापूर- वेळापूर (395),ज्ञानेश्वर मिसाळ- संगम -अकलूज ( 385) विजय शिंदे – मारकडवाडी- नातेपुते, (380) राजेंद्र उकिरडे- बोरगाव -अकलूज (363), अमोल नष्टे-चांदापुरी- पिलीव (362), रामकृष्ण काटकर-आनंदनगर-माळशिरस, (356), आण्णासो मगर-खुडुस -वेळापूर (341),
गुरुसेवा परिवार : प्रदीप अवताडे-बोंडले-वेळापूर (392), लक्ष्मण वाघ-यशवंतनगर-वेळापूर (356), सचिन गाटे-पिलीव (350)
इतर मागास प्रवर्ग: पांडुरंग मोहिते-अकलूज -अकलूज (382)
अनुसूचित जाती जमाती गट:
आत्माराम गायकवाड-कन्या माळशिरस-माळशिरस (366)
भटक्या विमुक्त गट:
आप्पासो खरात-माळशिरस-माळशिरस (382)
महिला प्रवर्ग:
दमयंती मांडवे-तांदूळवाडी-पिलीव (385)
शामतबी मुल्ला-दहिगाव-दहिगाव (366)
तालुक्यांतील सभासदांनी परिवर्तनासाठी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत संस्थेची अर्थ प्रतिष्ठा आणि प्रतिमा उंचावण्यासाठी संकल्पनामा पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही एकजुटीने पूर्ण करणार – दिलीप ताटे, स्वाभिमानी परिवर्तन पॅनल प्रमुख.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Fantastic perspective! I found myself nodding along. For additional info, click here: LEARN MORE. What’s everyone’s take?