माळशिरस नगरपंचायतीच्या गटारीचे घाण पाणी संथ वाहते श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरून….
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर स्थानिक नागरिक व वाहनधारक यांच्यामधून तीव्र नाराजी व्यक्त करून संतापाची लाट उसळली
माळशिरस ( बारामती झटका )
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायतीच्या हद्दीतील माळशिरस शहरातील गटारीचे घाण व सांडपाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरून संथ वाहत आहे. यामुळे सदरच्या रस्त्यावरून ये-जा करणारे स्थानिक नागरिक व वाहनधारक यांच्यामधून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. नितीन गाढवे व प्रशासनातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करून संतापाची लाट उसळलेली आहे.
माळशिरस शहरात मध्यवर्ती ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर एसटी स्टँड ते हनुमान मंदिर नेहमी गजबजलेल्या ठिकाणी गटारीतून घाण व सांडपाणी रस्त्यावर येऊन संथ गतीने वाहत आहे. याकडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची डोळे झाक झालेली आहे. रस्त्यावर वाहनधारक व स्थानिक नागरिक यांना दवाखाना, मेडिकल, किराणा सामान, भाजीपाला देवदर्शन अशा अनेक कारणाने रस्त्याचा वापर करावा लागत आहे. अशा वेळी वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहनधारकांना चालणाऱ्या लोकांची अडचण होत आहे. शालेय विद्यार्थी यांनासुद्धा आपले दप्तर व सायकल आवरण्यासाठी तारांबळ होत आहे.
नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांनी गेल्या चार दिवसापासून गटारीचे घाण व सांडपाणी रस्त्यावर वाहताना पाहिलेले आहे. तरीसुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. कोट्यावधी रुपये स्वच्छता व साफसफाई यावर खर्च होत असताना गटरीमध्ये तुंबलेला कचरा व फुटलेली गटार दुरुस्त करून सर्वसामान्य जनता व नागरिक यांच्यावर अधिकारी व कर्मचारी उपकार करीत नाहीत, असेही नागरिकांच्या मधून तीव्र संतापाने बोलले जात आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे संतापाची लाट उसळलेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Daejaun Porro achard