बारामती झटका न्यूज चॅनलने दिलेल्या बातमीची दखल, माळशिरस नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारीसह दाखल…
माळशिरस नगरपंचायतीच्या गटारीचे घाण पाणी संथ वाहते श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरून…. अशा मथळ्याची बातमी.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस नगरपंचायतीच्या गटारीचे घाण पाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरून वाहत आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर स्थानिक नागरिक व वाहनधारक यांच्यामधून तीव्र नाराजी व्यक्त करून संतापाची लाट उसळली आहे, अशा मथळ्याची बातमी बारामती झटका न्यूज यांनी दिलेली होती. बातमीची दखल घेऊन माळशिरस नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी जेसीबीसह दाखल झालेले आहेत. तुंबलेली गटार व गटारीवरील अतिक्रमण दूर केल्यानंतर रस्त्यावर येणारे घाण व सांडपाणी बंद होणार आहे. त्यामुळे नगरपंचायतीचे प्रशासन कामाला लागलेले असल्याने स्थानिक नागरिक व वाहनधारक यांच्यामधून समाधान व्यक्त केले जात आहे.

माळशिरस शहरात गटार व रस्त्यावरील गाळेधारक व स्थानिक रहिवासी यांनी केलेले अतिक्रमण यामुळेही नगरपंचायत प्रशासनाला अडचणीला सामोरे जावे लागत आहे. यासाठी अतिक्रमण करणाऱ्या लोकांनी स्वतःहून अतिक्रमण दूर करून गटरीचा व रस्त्याचा प्रश्न सुरळीत करावा, अन्यथा पोलीस बळाचा वापर करून अतिक्रमण काढावे असाही सूर सर्वसामान्य जनतेमधून येत आहे.
बारामती झटका वेब पोर्टल यांनी बातमी प्रसारित केलेली होती, त्यामधील मजकूर असा होता..
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायतीच्या हद्दीतील माळशिरस शहरातील गटारीचे घाण व सांडपाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरून संथ वाहत आहे. यामुळे सदरच्या रस्त्यावरून ये-जा करणारे स्थानिक नागरिक व वाहनधारक यांच्यामधून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे व प्रशासनातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करून संतापाची लाट उसळलेली आहे.
माळशिरस शहरात मध्यवर्ती ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पुणे पंढरपूर पालखी मार्गावर एसटी स्टँड ते हनुमान मंदिर नेहमी गजबजलेल्या ठिकाणी गटारीतून घाण व सांडपाणी रस्त्यावर येऊन संथ गतीने वाहत आहे. याकडे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची डोळेझाक झालेली आहे. रस्त्यावर वाहनधारक व स्थानिक नागरिक यांना दवाखाना, मेडिकल, किराणा सामान, भाजीपाला देवदर्शन अशा अनेक कारणाने रस्त्याचा वापर करावा लागत आहे. अशा वेळी वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहनधारकांना चालणाऱ्या लोकांची अडचण होत आहे. शालेय विद्यार्थी यांचीसुद्धा आपले दप्तर व सायकल आवरण्यासाठी तारांबळ होत आहे. नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी गेल्या चार दिवसापासून गटारीचे घाण व सांडपाणी रस्त्यावर वाहताना पाहिलेले आहे. तरीसुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. कोट्यावधी रुपये स्वच्छता व साफसफाई यावर खर्च होत असताना गटारीमध्ये तुंबलेला कचरा व फुटलेली गटार दुरुस्त करून सर्वसामान्य जनता व नागरिक यांच्यावर अधिकारी व कर्मचारी उपकार करीत नाहीत, असेही नागरिकांमधून तीव्र संतापाने बोलले जात आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे संतापाची लाट उसळलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng