कचरेवाडी येथे संस्कृतीताई सातपुते यांच्या शुभहस्ते शालेय व क्रीडा साहित्याचे वाटप
ग्रामपंचायत कचरेवाडी व माणुसकी प्रतिष्ठान यांच्यावतीने विविध उपक्रमाचे आयोजन
कचरेवाडी (बारामती झटका)
मौजे कचरेवाडी ता. माळशिरस येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, माळशिरस विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय दमदार आ. रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत कचरेवाडी व माणुसकी प्रतिष्ठान यांच्यावतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी समाजसेविका सौ. संस्कृतीताई राम सातपुते यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत कचरेवाडी व माणुसकी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने देण्यात आलेले शालेय साहित्य, क्रीडा साहित्य, खाऊवाटप करण्यात आले. तसेच ग्रामपंचायतच्या वतीने पंधरावा वित्त आयोगामधून कचरेवाडीतील सर्व अंगणवाडीसाठी गॅस कनेक्शन संचचे वाटप विद्यमान सरपंच सौ. उज्वलाताई हनुमंत सरगर, उपसरपंच यांच्या हस्ते करण्या आले.
यावेळी ज्ञानदेव मालोजी कोळेकर, माणुसकी प्रतिष्ठानचे डॉ. नाना विरकर, आप्पा सरगर, ग्रामपंचायत सदस्य व मित्रपरिवार त्याचबरोबर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर कचरेवाडी गावातील बहुसंख्येने महिला तसेच ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I enjoyed the humor in your piece! For further reading, check out: FIND OUT MORE. Let’s discuss!