Uncategorizedताज्या बातम्या

मनुष्याच्या मृत्युनंतर जितके दिवस नाव समाजात जिवंत राहते तेवढे त्याचे आयुष्य – ह.भ.प. बापूसाहेब देहूकर माऊली महाराज

ह.भ.प. मोहनानंद महाराज पुरंदावडेकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

पुरंदावडे (बारामती झटका)

दि. १४/३/२०२३ रोजी ह.भ.प. मोहनानंद महाराज पुरंदावडेकर यांचा ६१ वा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या प्रमाणात पार पडला. या कार्यक्रमात श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब देहूकर माऊली महाराज यांनी किर्तनातून मनुष्याच्या मृत्युनंतर जितके दिवस नाव समाजात जिवंत राहते तेवढे त्याचे आयुष्य. श्री संत तुकाराम महाराजांचे आयुष्य ४२ वर्षे १ महिना १७ दिवस होते, पण आजही ७०० वर्षे झाली तरीसुद्धा त्यांचे नाव आहे. तसेच यावेळी महाराजांनी आजच्या बाजारु किर्तनकारांचा व वात्रट विनोदाचार्यांचा समाचार घेतला.

सदरच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास अनंतलाल दोशी, मा. प्राचार्य देठे सर, पांडूरंग तात्या वाघमोडे, आण्णा ओरसे, साजिद भाई, अशोक गायकवाड, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सोमनाथजी भोसले, तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, मारूती खांडेकर, पुरंदावडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच देवीदास ढोपे, जनार्धन शिंदे, संतोष शिंदे, ज्ञानेश राऊत, पोपट गरगडे, पांडूरंग तात्या सालगुडे-पाटील, भानुदास सालगुडे-पाटील, बाळासो सालगुडे-पाटील, बाळासो सुळे पाटील, तानाजी सुळे पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाळासो धाईंजे, जिल्हा नेते विकासदादा धाईंजे, तालुक्याचे जेष्ठ नेते बुवानाना धाईंजे, तालुका अध्यक्ष गौतम धाईंजे, पुरंदावडे ग्रामपंचायतीचे सरपंच नाना पालवे, आनंदा सालगुडे-पाटील, नाना ओवाळ, अविनाश मोहिते, संत निळोबा महाराज दिंडी रुईछत्रपती ता. पारनेर, धोंडीराम नाळे, सागर ओवाळ, रवि पिसे, नाना पिसे, जालिंदर ओवाळ, संतोष ओवाळ, सोमनाथ ओवाळ, लालखान पठाण, माणुसकी प्रतिष्ठानचे अल्ताफ पठाण, धर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश (बापू) सालगुडे-पाटील, सुभाष सुज्ञे, प्रज्योत (तात्या) सालगुडे-पाटील मित्रमंडळ, जिव्हाळा फाऊंडेशनचे सर्व सदस्य, ज्ञानेश वारकरी संस्था दहिगाव, येळीव भजनी मंडळ, पुरंदावडे भजनी मंडळ, तिरवंडी भजनी मंडळ, मळोली भजनी मंडळ व इतर सर्व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button