Uncategorizedक्रीडाताज्या बातम्यामनोरंजन

पै. गणेश जगताप व उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर यांच्या लढत होणार…

सालाबादप्रमाणे बिरोबा यात्रेनिमित्त गोरडवाडी येथे निकाली कुस्त्यांचे भव्य जंगी मैदान

गोरडवाडी (बारामती झटका)

गोरडवाडी ता. माळशिरस येथे सालाबादप्रमाणे श्री बिरोबा यात्रेनिमित्त बिरोबा यात्रा कुस्ती कमिटी व समस्त ग्रामस्थ गोरडवाडी यांच्यावतीने निकाली कुस्त्यांच्या भव्य जंगी मैदानाचे आयोजन शनिवार दि. २५/३/२०२३ रोजी दुपारी ३ वा. बिरोबा मंदिर, गोरडवाडी, ता. माळशिरस येथे आयोजित करण्यात आले आहे.

या मैदानामध्ये कै. नानासो कर्णवर पाटील (माजी सरपंच), कै. तुकाराम कर्णवर पाटील यांच्या स्मरणार्थ बाळासाहेब कर्णवर पाटील (व्हा. चेअरमन, राजेवाडी), गौतमआबा माने (पंचायत समिती सदस्य), किरण माने (डबल सरपंच मांडकी), पांडुरंग तात्या वाघमोडे, धनाजी माने (उपनगराध्यक्ष, म्हसवड) यांच्यावतीने पै‌. गणेश जगताप, पुणे विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर, कोल्हापूर यांच्यात लढत होणार आहे. तसेच निवृत्ती (दादा) गोरड (माजी सरपंच) यांच्या स्मरणार्थ नाना गोरड, गोदबा गोरड, विजय गोरड (सरपंच) यांच्यावतीने पै. संग्राम साळुंखे, सदाशिवनगर विरुद्ध पै. सचिन ठोंबरे, कोल्हापूर यांच्यात लढत होणार आहे. तसेच लक्ष्मण पवार (माजी जिल्हा परिषद सदस्य, इस्लामपूर), कैलास पवार (उपसरपंच, इस्लामपूर), योगेश हुलगे (शिवशंकर कन्स्ट्रक्शन), नवनाथ रुपनवर (राष्ट्रवादी, तालुका उपाध्यक्ष इंदापूर) यांच्यावतीने पै. शुभम माने (कन्हेर) विरुद्ध पै. विक्रम भोसले (खवासपूर) यांच्यात लढत होणार आहे. कै. बिरा गोरड यांच्या स्मरणार्थ गोपीनाथ गोरड यांच्यातर्फे पै. आप्पा वळकुंदे, माळशिरस विरुद्ध पै. रविराज चव्हाण, पुणे यांच्यात लढत होणार आहे. कै. नानासो कळसुले यांच्या स्मरणार्थ दादासाहेब कळसुले (माजी ग्रामपंचायत सदस्य), रावसाहेब कळसुले, पै. मच्छिंद्र कळसुले यांच्यातर्फे पै. समाधान गोरड, गोरडवाडी विरुद्ध पै. शरद भिंगारे, कोल्हापूर यांच्यात लढत होणार आहे तसेच सोमनाथ कोकरे (विकास सोसायटी चेअरमन), रावसाहेब गोरड यांच्यावतीने पै. सुरज राऊत, माळशिरस विरुद्ध पै. ओम माने, खुडूस यांच्यात लढत होणार आहे. पोपट माने (सरपंच, कन्हेर), दादासाहेब चव्हाण (उद्योजक), अशोक ठवरे (राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष माळशिरस) यांच्यावतीने पै. धुळा पांढरे, नातेपुते विरुद्ध पै. तात्या घुले, अकलूज यांच्यात लढत होणार आहे. कै. ज्ञानदेव कोळेकर यांच्या स्मरणार्थ शिवमाऊली इंटरप्राईजेस यांच्यातर्फे हनुमंत कोळेकर, कै. सुभाष पुजारी यांच्या स्मरणार्थ विजय पुजारी यांच्यातर्फे पै. बापू सरगर, गोरडवाडी विरुद्ध पै. अजय सरवदे, सांगली यांच्यात लढत होणार आहे.

तसेच यावेळी उद्घाटनाची कुस्ती काकासाहेब आवळे, गोरडवाडी यांच्यावतीने पै. संग्राम पिसे, गोरडवाडी विरुद्ध पै. वीर माने, मांडकी यांच्यात लढत होणार आहे. यावेळी उपमहाराष्ट्र केसरी पै. किरण भगत यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कुस्ती मैदानाचे आयोजन बिरोबा यात्रा कुस्ती कमिटी, समस्त ग्रामस्थ गोरडवाडी, मारुती गोरड, यशवंत गोरड, तात्याबा गोरड, भिकाजी गोरड, अज्ञान गोरड, लक्ष्मण जगन्नाथ गोरड, लक्ष्मण बाबा गोरड, ज्ञानदेव गोरड, धुळा गणू गोरड, धुळा बिरा गोरड, शिवाजी शंकर गोरड, दत्तू कोळेकर, हनुमंत गोरड, भारत सरगर, गुलाब गोरड, रामचंद्र गोरड, महादेव यमगर, दादा गोरड, भागवत कर्णवर, दादा यमगर, अर्जुन गोरड, माणिक गोरड, तानाजी गोरड, किसन गोरड, बीरा हुलगे, सुभाष गोरड, भारत गोरड, पांडुरंग पिसे, खंडू कळसुले, दीपक गोरड, संतोष गोरड, म्हाकु यमगर, विष्णू गोरड, निलेश कळसुले, समीर गोरड, सचिन कदम, अनंता गोरड, सोमनाथ गोरड, नारायण गोरड हे आहेत.

या कुस्ती मैदानाचे समालोचन पै. हनुमंत शेंडगे हे करणार आहेत. या कुस्ती मैदानाच्या अधिक माहितीसाठी पांडुरंग पिसे ९९७५३९३४३४, आप्पा गोरड ९५५२७१६०६१, खंडू कळसुले ९५११९४७०७०, भारत सरगर ७२१९४५८१५८ यांच्याशी संपर्क साधावा. सदर कुस्ती मैदानास कुस्ती शौकीन, मल्ल सम्राट यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button