गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत न दिल्यास पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा
सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, त्यामुळे उध्वस्त झालेला शेतकरी यांना शासनाने त्वरित मदत करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना उभारी देणं महत्त्वाचं आहे. जर १५ दिवसात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही दिली तर, जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील यांना जिल्ह्यात फिरु देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष कमलाकर तात्या माने देशमुख यांनी दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी गारपिटीमुळे केळी, टरबूज, पपई, ऊस, द्राक्ष, मका, पालेभाज्या यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर द्राक्ष बागा पूर्णपणे झोपल्या आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडून हिरावून घेतला गेला आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत करून आधार देणे गरजेचे आहे. जर राज्य शासनाने पंधरा दिवसात मदत न दिल्यास सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील यांना सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकरतात्या माने देशमुख यांनी दिला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, या नैसर्गिक आपत्तीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी पूर्ण हताश झाला असून त्यांना आता तात्काळ मदत करणे गरजेचे असताना सरकार पंचनाम्याचा फार्स करत आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव, माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर, माळशिरस तालुका युवा आघाडी उपाध्यक्ष दत्ता भोसले, वेळापूर शहराध्यक्ष सचिन पवार आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना पंचनाम्याचा फार्स न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत करणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांची पोर पालकमंत्र्यांना सळो की पळो करून सोडतील – मदनसिंह जाधव, जिल्हा उपाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Wow, incredible blog structure! How long have you ever been blogging for?
you make blogging glance easy. The total look of your site is magnificent, let alone the
content material! You can see similar here ecommerce