एक लाखाची लाच घेताना सरपंचपती जाळ्यात #सरपंचपती #लाचलुचपत विभाग
लखपती, सरपंचपती, टार्गेट येणाऱ्या निवडणुकीला पंचायत समिती सभापती किंवा मिनी मंत्रालय अर्थात झेडपी आहे, त्यामुळे गप्प बसून कसे चालेल !
धाराशिव (बारामती झटका)
#जलजीवन मिशन अंतर्गत सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ योजनेचे काम पूर्ववत सुरू करण्यासाठी ठेकेदार कंपनीच्या साईट सुपरवायझरकडून सुमारे १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना #परंडा तालुक्यातील रोहकल ग्रामपंचायतीचा #सरपंचपती #लाचलुचपतच्या सापळ्यात अडकला. ही कारवाई गुरुवारी जिल्हा परिषद उपहारगृहात करण्यात आली.
परंडा तालुक्यातील रोहकल गावातील तीन वस्त्यांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ योजना मंजूर झाल्या होत्या. यासाठी शासनाने १८ लाख रुपये मंजूर केले होते. हे काम #मेनकर एनर्जी प्रा. लिमिटेड कंपनीला मिळाले. आदेश मिळताच काम सुरू केले. मात्र, सरपंचपती हनुमंत पांडुरंग कोलते यांनी ते काम थांबविले.
काही काळ गेल्यानंतर संबंधित काम पूर्ववत सुरू करण्यासाठी १ लाख ५० हजार रुपये द्या अथवा सोलरच्या तीन प्लेट आणि साहित्य अशा लाचेची मागणी कंपनीकडे करण्यात आली. परंतु, लाच देण्याची इच्छा नसल्याने कंपनीच्या साईट सुपरवायझरने २२ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्याच दिवशी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. खात्री पटल्यानंतर २३ मार्च रोजी सकाळी जिल्हा परिषद उपहारगृहात सापळा लावण्यात आला होता.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great read! Your breakdown of the topic is commendable. For further reading, here’s a useful resource: READ MORE. Let’s discuss!