Uncategorizedताज्या बातम्या

गावठाण संघर्ष समिती सदाशिवनगर यांच्यावतीने मोफत गावठाण मंजूर होण्याबाबत पालकमंत्र्यांना निवेदन… #गावठाण संघर्ष समिती सदाशिवनगर #पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील #रिपाई (आठवले गट)

सदाशिवनगर (बारामती झटका)

सदाशिवनगर ता. माळशिरस येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आले असता गावठाण संघर्ष समिती सदाशिवनगर यांच्यावतीने मौजे सदाशिवनगर येथील मोफत गावठाण मंजूर होण्याबाबतचे निवेदन रिपाई (आठवले गट) सोलापूर जिल्हा अध्यक्ष व गावठाण संघर्ष समितीचे अध्यक्ष सोमनाथ भोसले, सचिव प्रताप सालगुडे व रिपाई तालुका सरचिटणीस मारुती खांडेकर यांच्यावतीने देऊन गावठाण मंजूर होण्याबाबतची मागणी करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदाशिवनगर ग्रामपंचायत ही पुरंदावडे ग्रामपंचायतमधून १९८८ साली स्वतंत्र झाली आहे. १९८८ ते १९९२ पर्यंत प्रशासक व १९९२ ला सदाशिवनगर ग्रामपंचायतीची पहिली सार्वजनिक निवडणूक झाली. तेव्हापासून गावास गावठाण मिळण्यासाठी ग्रामपंचायत व गावठाण संघर्ष समिती यांच्यावतीने मोर्चे, रस्ता रोको आंदोलन, गाव बंद, तहसील कार्यालय व प्रांत कार्यालय उपोषण करून व वेळोवेळी निवेदने देऊनसुद्धा गावठाणाचा प्रश्न प्रलंबित आहे.

शेती महामंडळाकडील गट क्रमांक ४४, ८९, ९१, १२०, १२१, २२१ या क्षेत्राचे गावठाणासाठी मागणी करण्यात आली असून या गटामध्ये गेली ४० वर्षापासून भूमिहीन, शेतमजूर, दलित व बहुजन समाज राहत असून गावठाण नसल्यामुळे शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळू शकला नाही. वरील सर्व गटाची मोजणी करण्यासाठी ग्रामपंचायतीने २८ हजार ५०० रुपये मोजणी फी दि. २/११/२०१३ रोजी भूमी आलेख कार्यालय, माळशिरस येथे भरून सदर गटाची मोजणी दि. १९/१२/२०१३ रोजी पूर्ण झालेली आहे. शेती महामंडळाकडील मागणी करण्यात आलेल्या गटातील क्षेत्रास जिल्हाधिकारी सोलापूर यांनी मंजुरी दिली आहे. तरी लोकहितार्थ व सार्वजनिक प्रयोजनासाठी मौजे सदाशिवनगर वरील गटातील जागा गावठाणासाठी मोफत देण्याबाबत सहानभूतीपूर्वक विचार व्हावा, असे पालकमंञ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button