वेळापूर येथे अर्धनारी नटेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन #वेळापूर #अर्धनारी नटेश्वर यात्रा
५ एप्रिल रोजी गौतमी पाटील वेळापुरात
वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर ता. माळशिरस येथे आराध्य दैवत अर्धनारी नटेश्वराच्या यात्रा महोत्सवानिमित्त २५ मार्च ते १३ एप्रिल २०२३ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष मिलिंद सरतापे व सरपंच रजनीश बनसोडे यांनी दिली आहे.
दि. २८ मार्च २०२३ रोजी रात्री श्रींचा लग्न सोहळा, महाप्रसाद दुपारी ४ ते रात्री ९ पर्यंत, दि. ५ एप्रिल रोजी गौतमी पाटील यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम सायंकाळी ७ वा. पालखी मैदान येथे होणार आहे. दि. ६ एप्रिल रोजी रात्री ११ ते १ शोभेचे दारूकाम व साड्यांचा कार्यक्रम होणार आहे. दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दिवसभर उत्तमराव जानकर यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर गजी ढोल व भेदी गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. दि. ८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता बाजार तळ, वेळापूर येथे क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे.
दि. ९ एप्रिल रोजी पालखी मैदान, वेळापूर येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे. या बैलगाडा शर्यतीसाठी पहिले बक्षीस स्प्लेंडर व ढाल, दुसरे बक्षीस ३२ इंची एलईडी टीव्ही व ढाल, तिसरे बक्षीस वॉशिंग मशीन व ढाल, चौथे बक्षीस २०० लिटर फ्रिज व ढाल, पाचवे बक्षीस कुलर व ढाल, सहावे बक्षीस छकडा गाडी व ढाल, सातवे बक्षीस गदा व ढाल अशी ठेवण्यात आली आहे. दि. १० एप्रिल २०२३ रोजी रेड्यांच्या टकरी, दि. १३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सत्यनारायण पूजा व सायंकाळी ७ वाजता जागरण गोंधळाचा कार्यक्रम आदी कार्यक्रम ठेवण्यात आले असून या सर्व कार्यक्रमांचा वेळापूर ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अर्धनारी नटेश्वर यात्रा कमिटी वेळापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
यावेळी यात्रा कमिटीचे कार्याध्यक्ष विनायक माने, खजिनदार जावेद मुलाणी, उपाध्यक्ष धनंजय शिवपुजे, उपसरपंच तानाजी चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे, मार्केट कमिटीचे माजी संचालक दादासाहेब घाडगे, संजय मंडले, संदीप माने देशमुख, शिवसेनेचे रामकृष्ण जाधव, राजाभाऊ शिंदे, विश्वास वाघे, काशिनाथ आडत, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष युवराज मंडले, उमेश भाकरे, अमोल पनासे, अश्विनी भानवसे, ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब मुंगूसकर, हनुमंत वायदंडे, सीमा खाडे, प्रियंका आडत, विमल जाधव, छाया साठे, अंजना माने, सिमरन मुलाणी व सदस्य यावेळी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng